Airbus Aircraft Tata : एअरबस विमानाला आता भारतातच दरवाजे बसविले जातील आणि हे पहिल्यांदाच घडणार आहे. Tata Advanced Systems Limited (TASL) त्यांच्या हैदराबाद येथील प्लांटमध्ये A320 निओ विमानांसाठी कार्गो आणि बल्क कार्गो दरवाजे तयार करणार आहे. एअरबस एअरक्राफ्टने बुधवारी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (TASL) ला A320neo विमानांसाठी कार्गो आणि बल्क कार्गो दरवाजे तयार करण्याचे कंत्राट दिले. एअरलाईन मार्केटमध्ये एअरबसला आणखी पुढे नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Table of contents [Show]
हैदराबाद येथे तयार होणार दरवाजे
TASL (Tata Advanced Systems Ltd) हैदराबादमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरून हे दरवाजे तयार करेल. प्रत्येक शिपसेटमध्ये दोन मालवाहू दरवाजे आणि एक मोठ्या मालवाहू दरवाजाचा समावेश असेल. हैदराबादमध्ये ऑलिव्हियर कोक्विल, एसव्हीपी एरोस्ट्रक्चर प्रोक्योरमेंट, एअरबस आणि मसूद हुसैनी, व्हीपी आणि एचओ एरोस्ट्रक्चर आणि एरो-इंजिन, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी करारावर स्वाक्षरी केली.
युनियनच्या चार देशांमध्ये 16 ठिकाणी एअरबसचे ऑफीस
फ्रेंच कंपनी एअरबसची स्थापना 1970 मध्ये झाली होती. जर्मनी, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि स्पेन या युरोपियन युनियनच्या चार देशांमधील सोळा ठिकाणी एअरबस अंदाजे 57,000 कर्मचारी काम करते. प्राप्त माहितीनुसार, एअरबसमधील प्रमुख लोकांमध्ये सीईओ थॉमस अँडर्स, सीएफओ हॅराल्ड विल्हेम, मुख्य व्यावसायिक अधिकारी जॉन लेही आणि सीओओ फॅब्रिस ब्रेगियर यांचा समावेश आहे. भूतकाळात, एअरबसने सलग चौथ्या वर्षी बोईंगच्या पुढे जगातील सर्वात मोठी विमान उत्पादक कंपनी म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे.
फेब्रुवारी 2023 मध्येही पार पडला मोठा करार
टाटा समूह, भारतातील सर्वात जुन्या व्यावसायिक समूहांपैकी एक, फेब्रुवारी महिन्यात टाटा समुहाने आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान वाहतूक करार देखील केला असल्याची माहिती होती. या अंतर्गत एअर इंडिया एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. यामध्ये 40 वाइड बॉडी वेव्ह ए350 विमानांचा समावेश होता, तर 210 नॅरो बॉडी विमानांची ऑर्डर देण्यात आला होता. एअरबससोबतचा करार हा एअर इंडियाच्या 470 विमानांच्या मोठ्या ऑर्डरचा एक भाग होता, ज्यामध्ये बोईंगच्या 220 विमानांचाही समावेश होता, असेही मानल्या जाते.
दिवसेंदिवस वाढतोय प्रगतीचा टक्का
2022 मध्ये, एअरबसने 1,078 जेट ऑर्डरनंतर नवीन विमान ऑर्डर आणि डिलिव्हरीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. एअरबसने गेल्या वर्षी 661 विमाने वितरित केली, जी 2021 च्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढली आहे. तर बोईंगने 480 विमाने दिली आहेत.