देशभरात असंख्य लोक आयपीएल या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाची आतुरतेने वाट बघत असतात. तिकिटे, स्पॉन्सरशीप व थेट प्रक्षेपणातून बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. वर्षभरापूर्वी स्पर्धेची टायटल स्पॉन्सरशीप टाटा समूहाने सर्वाधिक 670 कोटी रुपयांची बोली लावत जिंकली. 2008 ते 2023 या दरम्यान या टायटल स्पॉन्सरशीपची रक्कम 16 पटीने वाढली आहे. डिएलएफ, पेप्सी ग्रुप, विवो, ड्रीम-11 आणि आता टाटा या उद्योग समूहांनी IPL चे मुख्य स्पॉन्सर्ड होण्यासाठी शेकडो कोटी रुपये मोजले. IPL च्या प्रायोजक रक्कमेतून बीसीसीआयने जवळपास 1850 कोटींची बंपर कमाई केली आहे.
Table of contents [Show]
DLF (2008 ते 2012)
देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी असलेल्या DLF ने स्पर्धेच्या सुरुवातीला टायटल स्पॉन्सरशिप जिंकली होती. डीएलएफने 40 कोटींची बोली लावून BCCI सोबत चार वर्षांसाठी करार केला होता. 2012 मध्ये हा करार संपुष्टात आला. त्यानंतर डीएलएफने कराराचे नुतनीकरण केले नाही. बीसीसीआयला नव्याने स्पॉन्सर शोधण्याची प्रक्रिया करावी लागली.
पेप्सी (2013 ते 2015)
डीएलएफने कराराचे नूतनीकरण केले नसताना, शीतपेय उद्योगातील जागतिक पातळीवरील दिग्गज कंपनी पेप्सी 2013 मध्ये आयपीएल स्पर्धेचे अधिकृत स्पॉन्सर झाले. आयपीएल स्पॉन्सर करणारा हा दुसरा ब्रँड ठरला. कंपनीने पाच वर्षांच्या कालावधीसाठी 396 कोटींची बोली लावून प्रायोजकाचे हक्क घेतले होते. 2016 मध्ये स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे कंपनी एक वर्ष आधी करारातून बाहेर पडली.
Vivo (2016 ते 2019 )
चिनी मोबाईल निर्माता कंपनी विवोने 'बीसीसीआय'सोबत दोन वर्षांचा करार केला होता. 2016 मध्ये विवो कंपनीन IPL च्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी 100 कोटी रुपये मोजले होते.
Vivo (2018 ते 2019)
मोबाईल कंपनी विवोने 2199 कोटींची बोली लावून 5 वर्षांसाठी स्पॉन्सरशीप हक्कांचे नुतनीकरण केले. Vivo ने बीसीसीआयला वर्षाला अंदाजे 440 कोटी दिले होते. मात्र 2020 मध्ये भारत आणि चीन सीमेजवळ गलवान खोऱ्यातील लष्करी संघर्षानंतर सरकारने चीनविरोधात धोरण कठोर केले. देशांतर्गत चीनी कंपन्यांना विरोध होऊ लागल्याने IPL कराराची मुदत संपण्यापूर्वीच विवो कंपनीना या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
Dream11 (2020)
Vivo कंपनीसोबतचा हा करार संपुष्टात आल्यानंतर Dream11 या गेमिंग प्लॅटफॉर्मने एक वर्षासाठी 222 कोटी रुपायांमध्ये IPL चे टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.
Vivo IPL (2021)
2021 साली Vivo कंपनीने आयपीएलची टायटल स्पॉन्सरशीप पुन्हा एकदा मिळवली. कारण या कालावधीत चीन-भारत तणाव कमी झाला होता म्हणून यावर्षी ही कंपनी टायटल स्पॉन्सरशीप मिळवली मात्र तरीही हा विरोध कायम राहीला व कंपनीने हा करार मोडला व बाहेर पडली.
TATA (2022 व 2023)
आयपीएल सारख्या लोकप्रिय स्पर्धेचे प्रायोजकत्व भारतीय कंपनीकडे असावे, असा आग्रह धरला जात होता. TATA ग्रुपने ही संधी साधली आणि 2022 साली झालेल्या लिलावात सहभाग घेतला. टाटा ग्रुपने वर्ष 2022 आणि 2023 या दोन वर्षांसाठी IPL चे टायटल स्पॉन्सर्ड म्हणून 670 कोटी रुपयांचा करार केला.