Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Virgin Orbit LayOff: बिलेनिअर रिचर्ड ब्रान्सन यांचा व्हर्जिन ग्रुप मंदीच्या संकटात, व्हर्जिन ऑर्बिटमध्ये मोठी नोकर कपात

Virgin Orbit Lay Off

Virgin Orbit LayOff: जगातील श्रीमंत उद्योजकांच्या पैकी एक ब्रिटीश रिचर्ड ब्रान्सन यांच्या व्हर्जिन समूहाला मंदीचे तडाखे बसले आहेत. ब्नान्सन यांच्या मालकीची व्हर्जिन ऑर्बिट ही कंपनी जवळपास 85% कर्मचारी कामावरुन कमी करणार आहे.व्हर्जिन ऑर्बिट ही जगभरात रॉकेट तयार करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.कंपनीने तडकाफडकी नोकर कपातीची घोषणा केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये व्हर्जिन ऑर्बिटच्या शेअरमध्ये

जगातील श्रीमंत उद्योजकांच्या पैकी एक ब्रिटीश रिचर्ड ब्रान्सन यांच्या व्हर्जिन समूहाला मंदीचे तडाखे बसले आहेत. ब्नान्सन यांच्या मालकीची व्हर्जिन ऑर्बिट ही कंपनी जवळपास 85% कर्मचारी कामावरुन कमी करणार आहे.व्हर्जिन ऑर्बिट ही जगभरात रॉकेट तयार करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.कंपनीने तडकाफडकी नोकर कपातीची घोषणा केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये  व्हर्जिन ऑर्बिटच्या शेअरमध्ये तब्बल 38% घसरण झाली.नोकर कपातीमुळे व्हर्जिनमधील 675 कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. ((Virgin Orbit Holdings Inc lay off 85% workforce)

अमेरिका आणि युरोपातील बड्या कंपन्यांना सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषत:माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा सपाटा लावला आहे. मागील तीन महिन्यात अमेरिकेतील आयटी कंपन्यांमधील जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकर कपातीची घोषणा केली जात आहे. त्यात आता व्हर्जिन ऑर्बिट या कंपनीचा देखील समावेश झाला आहे.

व्हर्जिन ऑर्बिटमध्ये नव्याने गुंतवणूक मिळणे अवघड बनले आहे. विद्यमान गुंतवणूकदारांनी आणखी गुंतवणूक करण्याबाबत अनुत्सुकता दाखवली. त्यामुळे कंपनीला खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. एकूण मनु्ष्यबळापैकी व्हर्जिन ऑर्बिट तब्बल 85% कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे. त्यानुसार 675 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागेल.या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर नुकसान भरपाईसाठी व्हर्जिन ऑर्बिटला 15 मिलियन डॉलर्स इतका खर्चाचा भार उचलावा लागेल, असे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे.

कंपनीच्या माहितीनुसार 15 मार्च 2023 अखेर व्हर्जिन ऑर्बिटकडे 750 कर्मचाऱ्यांचा ताफा होता. त्यातील 85% कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आले आहे. त्यापैकी शिल्लक कर्मचारी 23 मार्चपासून कामावर येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 3 एप्रिल 2023 पर्यंत कंपनीकडून नोकर कपातीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्हर्जिन ऑर्बिट व्यवस्थापनाची  मॅथ्यु ब्राऊन या गुंतवणूकदाराशी तातडीने 200 मिलियन डॉलर्सचा निधी मिळवण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र ही चर्चा फिस्कटली आणि व्हर्जिन ऑर्बिटचे आर्थिक मदतीचे दरवाजे बंद झाले.  

व्हर्जिन ऑर्बिटवर दिवाळखोरीचे संकट

व्हर्जिन ऑर्बिटवर दिवाळखोरीचे संकट घोंघावत आहे. नोव्हेंबर 2022 पासून रिचर्ड ब्नान्सन यांनी व्हर्जिन ऑर्बिटसाठी 50 मिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्य करुन कंपनीला तारले. व्हर्जिनने महत्वाची मशीनरी आणि मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. ते फेडण्यासाठी ब्रान्सन यांना मोठी तजवीज करावी लागली. मात्र जानेवारी महिन्यात व्हर्जिन ऑर्बिटच्या संकटात आणखी भर पडली.कंपनीने रॉकेट प्रक्षेपण अयशस्वी ठरले. ज्यानंतर गुंतणूकदारांनी नव्या गुंतवणुकीपासून चार हात लांब राहणे पसंत केले. नव्याने गुंतवणूक मिळत नसल्याने व्हर्जिनकडे खर्च कमी करण्यासाठी नोकर कपातीचा पर्याय उरला.

व्हर्जिन ऑर्बिटचे शेअर कोसळले 

virgin-orbit-holdings-inc.jpg

जानेवारी महिन्यात रॉकेट प्रक्षेपण फेल गेल्यानंतर कंपनीच्या अडचणी वाढल्या. आता कंपनीने नोकर कपातीची घोषणा करताच त्याचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले. या घोषणेनंतर गुरुवारी अमेरिकेतील नॅसडॅकमध्ये व्हर्जिन ऑर्बिटच्या शेअरमध्ये प्रचंड  घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर तो 45% घसरणीसह 0.1871 डॉलरवर स्थिरावला. कालच्या सत्रात व्हर्जिन ऑर्बिटमध्ये 11.76 मिलियन शेअर्सचा व्हॉल्यूम होता. वर्ष 2021 मध्ये व्हर्जिन ऑर्बिटने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता.मात्र वर्ष 2023 पासून व्हर्जिन ऑर्बिटचा शेअर 80% अधिक कोसळला आहे. ज्याचा फटका रिचर्ड ब्रान्सन यांच्यासह लाखो गुंतवणूकदारांना देखील बसला.

(News Source : Reuters, ET, MarketWatch.com)