Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 expectations: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! सुकन्या समृद्धी योजनेसह अल्पबचत योजनांना बजेटमधून मिळणार प्रोत्साहन

Budget 2023 expectations

सुकन्या समृद्धी योजना आणि इतर अल्पबचत योजनांना Budget 2023 मधून आणखी सहकार्य मिळणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून अल्पबचत योजनांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं अहवालात म्हटले आहे.

Budget 2023 expectations: सुकन्या समृद्धी योजना आणि इतर अल्पबचत योजनांना Budget 2023 मधून आणखी सहकार्य मिळणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून अल्पबचतीच्या योजनांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं अहवालात म्हटले आहे. अल्पबचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदरही येत्या काळात आणखी वाढू शकतात. अल्प बचत योजनांमध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते.

सध्या केंद्र सरकारची वित्तीय तूट 6% आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि भांडवली खर्च करण्यासाठी सरकारला निधीची गरज आहे. त्यासाठी अल्प बचत योजनांमधून जमा होणारा पैसा सरकारला मिळू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेद्वारे आणखी रजिस्ट्रेशन वाढवण्यासाठी सरकारकडून अभियान राबवले जाऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. 12 वर्षांच्या आतील ज्या मुलींची नोंदणी या योजनेमध्ये झालेली नाही, त्यांचा समावेश करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रोत्साहन देण्यात येऊ शकते.

बँकांद्वारे योजनांची नोंदणी कमी( SSY registration through bank is low)

सुकन्या समृद्धी योजनेची बँकांकडून अल्प प्रमाणात नोंदणी झाली आहे. त्यामुळे बँकाकडून अधिक प्रतिनिधी नेमून या योजनेमध्ये नोंदणी करण्यात येऊ शकते. डिसेंबरमध्ये सरकारने काही अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले होते. मात्र, SSY योजनेच्या व्याजदरात वाढ केली नव्हती.

काय आहे सुकन्या समृद्धी योजना? (What is Sukanya Samriddhi Yojana)

“सुकन्या समृद्धी योजना” ही एक सूक्ष्मलक्ष्यी (Micro Level) योजना असून तिची सुरुवात पंतप्रधानांच्या “बेटी बचाओ-बेटी पढाओ” (Beti Bachao Beti Padhao) या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत केली आहे. कन्या-अपत्याचे शिक्षण आणि तिच्या विवाहाचे प्रसंगी आर्थिक आधार सुनिश्चित करण्याच्या हेतूने मुलीचे आई-वडील किंवा तिचे कायदेशीर पालक तिच्या नावाने या योजनेअंतर्गत कोणत्याही अधिकृत बँकेमध्ये किंवा जवळच्या पोस्ट-ऑफिसात खाते उघडू शकतात.

या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने सुरू केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदाराला देखील वार्षिक 5 लाखांपर्यंत इन्कम टॅक्स अधिनियम, 1961 च्या (Income Tax Act 1961) कलम 80 (सी) अंतर्गत कर सवलत (Tax Benefit) देखील प्रदान करते. गुंतवणुकीवर व्याजदर तरल ठेवला असला तरीदेखील सद्यस्थितीमध्ये तो 7.60 टक्के (2022-2023 करीता) इतका असून गुंतवणुकीचा कालावधी हा 15 वर्षे निश्चित केला आहे. तसेच अगदी 250 रुपयांपासून सुरू करता येणारी ही गुंतवणूक वार्षिक 1.5 लाखापर्यंत वाढवता येते.