Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Halwa Ceremony | अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी बनवला जातो हलवा, काय आहे हलवा समारंभाचे महत्व, जाणून घ्या!

Halwa Ceremony

Budget 2023: सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ साजरा केला जातो. परंपरेनुसार, अर्थ मंत्रालयात हलवा बनवला जातो. हा हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खायला दिला जातो. अर्थसंकल्पाच्या कामात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जातो.

Halwa Ceremony Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Union Budget) सादर करणार आहेत. परंपरेनुसार,अर्थ मंत्रालयात केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जातो. यावर्षी हा समारंभ कधी पार पडणार यासंबंधीची अधिकृत तारीख आता समोर आली आहे.

यावर्षी 26 जानेवारी, 2023 (गुरुवार) रोजी हलवा समारंभ पार पडणार आहे. परंपरेनुसार, हलवा समारंभाच्या वेळी वित्त मंत्रालयात हलवा बनवला जातो. बनवण्यात आलेला हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खायला दिला जातो.अर्थसंकल्पाच्या निर्मितीत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केल्यानंतरच अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करत असतात.

 दरवर्षी पार पडतो हलवा समारंभ!

हलवा समारंभाचा विधी दरवर्षी आयोजित केला जातो. अर्थसंकल्प छपाईसाठी गेल्यावर हा सोहळा पार पडतो. पण 2022 मध्ये कोविडमुळे हा समारंभ होऊ शकला नाही. कोरोना संसर्ग असताना अर्थ मंत्रालयाच्या मुख्य कर्मचाऱ्यांन हलव्याऐवजी मिठाई देण्यात आली होती. भारतीय परंपरेत कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गोड खाण्याची परंपरा आहे. याच परंपरेचे पालन गेली कित्येक वर्षे भारताचे अर्थमंत्रालय करत आहे. 

अर्थ मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांचा ‘लॉक-इन’ पीरियड

अर्थसंकल्पापूर्वी हलवा समारंभ आयोजित करणे हा परंपरेचा भाग बनला आहे. हा समारंभ पार पडला म्हणजे अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांचा ‘लॉक-इन’ पीरियड सुरु झाला असे समजले जाते. हलवा समारंभानंतर उद्या म्हणजेच 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी अर्थ मंत्रालयातच राहतील. हे अधिकारी अर्थसंकल्प सादर होइपर्यंत घरी जाणार नाहीयेत. अर्थ मंत्रालयाचे अधिकारी जवळपास आठवडाभर कुटुंबापासून दूर राहणार आहेत. यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होऊन 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 सत्र होणार आहेत. अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत असेल. सुमारे महिनाभराच्या सुट्यांनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 12 मार्चपासून सुरू होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.