घराच्या बाहेर पडल्यानंतर खिशात पैसे लागतात, असं आपण वारंवार ऐकत असतो. त्यावरून वाढत्या महागाईचा (Inflation), राहण्याच्या स्तराचा (Cost of living) अंदाज येतो. मात्र जगात असे अनेक देश आहेत, जे राहण्यासाठी अत्यंत महागडे (Expensive) आहेत. मात्र यात अमेरिका, ब्रिटन किंवा जपान हे देश नाहीत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातला सर्वात महागडा देश आहे बरमुडा (Bermuda). फारसा चर्चेत नसलेला हा देश अत्यंत महागडा असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सकडून यादी जाहीर
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनं 'एक्स'वर (पूर्वाश्रमीचं ट्विटर) यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. विविध देशांची यादीच जारी करण्यात आली आहे. यात टॉप 10 देश आहेत. तर भारताच्या नावापर्यंत ही यादी पाहायला मिळू शकते. पहिल्या दहा महागड्या देशांमध्ये बरमुडानंतर स्वित्झर्लंड, केमॅन आयलँड्स, बहामास, आइसलँड, सिंगापूर, बार्बाडोस, नॉर्वे, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्रमांक लागतो.
Most expensive countries to live:
— World of Statistics (@stats_feed) July 28, 2023
1. Bermuda ??
2. Switzerland ??
3. Cayman Islands ??
4. Bahamas ??
5. Iceland ??
6. Singapore ??
7. Barbados ??
8. Norway ??
9. Denmark ??
10. Australia ??
.
12. USA ??
13. Hong Kong ??
15. Luxembourg ??
16. New Zealand ??
17. Ireland ??…
उत्तर अटलांटिक महासागरातलं एक बेट
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्समार्फत विविध क्षेत्रातली आकडेवारी जारी केली जाते. त्यात एकूण टक्केवारीदेखील असते. आता महागाईच्या बाबतीत कोणते देश आहेत, यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. एकूण 140 देशांची नावं या यादीत आहेत. त्यात बरमुडा देशाचं राहणीमान (Cost of living) सर्वात जास्त आहे. बरमुडा हा उत्तर अटलांटिक महासागरातलं एक बेट आहे.
भारताचं स्थान
या रिपोर्टमध्ये 140 देशांची नावं आहेत. त्यात भारताचा क्रमांक 138वा आहे. म्हणजेच भारताचा क्रमांक तळाशी आहे. बांगलादेशाचा क्रमांकही भारताच्या वर आहे. बांगलादेश 133व्या स्थानी आहे. तर पाकिस्तान 140व्या स्थानी आहे. पहिल्या काही देशांमध्ये विकसित देशांचा क्रमांक लागतो. त्यात युरोपीयन आणि अमेरिकन देश दिसून येतात. तर तळाशी असलेल्या देशांमध्ये आफ्रिकन आणि काही आशियायी देशांची नावं दिसतात. त्यामुळे भारतातून बाहेर जाणाऱ्या किंवा स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या भारतीयांनी याविषयीची अधिक माहिती नक्कीच जवळ ठेवावी.