Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: रतनजोत ठरतेय वरदान! 'बायोडिझेल'मुळे शेतकऱ्यांना चांगल्या कमाईची संधी

Biodiesel Palnt Jatropha

Business Idea: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्यावर अनेक पर्याय शोधले जात आहेत. जसे की, ऊसामधून मिळत असलेल्या इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे डिझेलला पर्याय म्हणून बायोडिझेल देणाऱ्या वनस्पतींची लागवड शेतकरी करीत आहेत. यामध्ये रतनजोत या वनस्पतीचा समावेश आहे. यामधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

Biodiesel Plant Jatropha: शेती करतांना येणाऱ्या अनेक अडचनींना समोरे जाणारे शेतकरी आता नगदी पिके घेऊ लागले आहेत. त्याचबरोबर लागवड केलेल्या पिकांमधून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल? याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे शेतकरी आता ऊस, कापूस, चहा, ताग यासारख्या हमखास रकक्म मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करतांना दिसत आहे. यामध्येच आता बायोडिझेल मिळवून देणाऱ्या आणि औषधयुक्त  अशा रतनजोत वनस्पतीची लागवड अनेक शेतकरी करीत आहेत.

कोरडवाहू शेतीत घेता येते पीक

रतनजोत वनस्पतीला जेट्रोफा (Jatropha), अल्कानेट रुट, डिझेलचे झाड असेही म्हटले जाते. या वनस्पतीची लागवड कोरडवाहू शेतजमीनतही केली जाते. या वनस्पतीची लागवड करुन शेतकरी कमी मेहनत आणि कमी खर्चात वर्षाचे लाखो रुपये उत्पन्न मिळवू शकतो. या वनस्पतीच्या बिया मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. केवळ पाच ते सहा महिन्यात या रतनजोत वनस्पतीच्या झाडांची योग्य वाढ होते. आणि त्यानंतर ही झाडे तुम्हाला जवळपास पाच ते सहा वर्ष नफा मिळवून देते.

वर्षाला लाखोंचे उत्पन्न

रतनजोत वनस्पतीला येणाऱ्या फळांमध्ये असंख्य बिया असतात. त्यामुळे एका झाडापासून जवळपास 25 ते 30 टक्के तेल मिळते. यामधून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग बायोडिझेल म्हणून केल्या जाते. रतनजोत वनस्पतीला येणाऱ्या फळांमधून बिया वेगळ्या केल्या जातात, त्याला स्वच्छ केले जाते. त्यानंतर  तेल काढण्याच्या मशीन मध्ये टाकून त्यामधून तेल मिळवले जाते. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे संपूर्ण जगात या वनस्पतीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वनस्पतीचे उत्पन्न घेण्यास भारत सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. एक एकर जमीनीत 8 ते 10 क्विंटल रतनजोत बियांचे उत्पन्न मिळते. मार्केटमध्ये या बियांची किंमत प्रति क्विंटल 1800 ते 2500 रुपये एवढी आहे. त्यामुळे पारंपारिक शेती बरोबरच या वनस्पतीची शेती केल्यास शेतकऱ्यांना वर्षाला लाखोंचे उत्पन्न मिळू शकते.

आयुर्वेदिक वनस्पती

तसेच रतनजोत ही एक आयुर्वेदिक वनस्पती असल्याने त्याचा उपयोग अनेक औषधांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील होतो. ही वनस्पती ह्दयाच्या आरोग्याकरीता, डोकेदुखी, निद्रानाश, ताप, रक्तदाब, यासारख्या आरोग्यविषयक तक्रारींवर रामबाण उपाय आहे. तसेच एलर्जी, खाज सुटणे यावर औषध म्हणून लावल्या जाणाऱ्या क्रीम आणि अँटीबॅक्टेरिअल क्रीम तयार करतांना देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो. त्यामुळे अशा कंपन्यांसोबत करार करुन सुध्दा शेतकरी नफा मिळवू शकतात.