Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Butterfly Film Offer: बटरफ्लाय सिनेमाची अनोखी ऑफर; एका तिकिटावर दोघांना सिनेमा पाहता येणार!

Butterfly Film Offer

Image Source : www.spicyonion.com

Butterfly Film Offer: मीरा वेलणकर दिग्दर्शित 'बटरफ्लाय' हा चित्रपट 2 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असून चित्रपटाच्या टीमकडून प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. दोन व्यक्तींच्या तिकिटावर 50 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट कुठे आणि कसा मिळवायचा जाणून घेऊयात.

सध्या मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले आहेत. असाच एक नवीन विषय 'बटरफ्लाय' या नव्याकोऱ्या चित्रपटाच्या रूपाने पाहायला मिळत आहे. असीम एंटरटेनमेंट आणि अप्रोग्राम स्टुडिओ प्रस्तुत, मीरा वेलणकर दिग्दर्शित 'बटरफ्लाय' (Butterfly) हा चित्रपट 2 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

या चित्रपटात मधुरा वेलणकर-साटम, महेश मांजरेकर, अभिजित साटम आणि प्रदीप वेलणकर यासारख्या दिग्गज आणि नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच बटरफ्लाय चित्रपटाच्या टीमकडून प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. दोन व्यक्तींच्या तिकिटावर 50 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. नेमकी ऑफर काय, आणि त्यासाठी कुठे तिकीट बुक करायचे जाणून घेऊयात.

दोन तिकिटांवर 50 टक्के डिस्काऊंट

'बटरफ्लाय' हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी एक विशेष ऑफर देण्यात येत आहे. आजपासून म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी प्रेक्षकांनी चित्रपटाची दोन तिकीटे बुक केल्यावर त्यांना 50 टक्के डिस्काउंट देण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की, प्रेक्षकांना केवळ एकाच तिकिटाचे पैसे द्यावे लागणार आहेत. चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी प्रेक्षक Book My Show या ॲपचा वापर करू शकतात.

अशाप्रकारे मिळावा डिस्काउंट 

बटरप्लाय चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी प्रेक्षक Book My Show ॲपला किंवा वेबसाईटला भेट देऊ शकतात.

वेबसाईटवर गेल्यावर Movie Section मध्ये बटरफ्लाय चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळेल. त्याच्या खाली असणाऱ्या Book Ticket पर्यायावर प्रेक्षकांना क्लिक करावे लागेल.

त्यानंतर 2 सीट्स निवडून पुढील तपशील जसे की, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इ. माहिती भरावी लागेल. त्यानंतर Payment पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता 'BUTTERFLY' हा विशेष ऑफर कोड टाकून प्रेक्षक 50% डिस्काउंट मिळवू शकतात. या डिस्काउंटमुळे प्रेक्षकांना 1 तिकिटांच्या किंमतीत 2 लोकांना चित्रपट पाहता येणार आहे.

पेमेंट करण्यासाठी प्रेक्षक UPI, क्रेडिट कार्ड किंवा वॉलेटचा पर्याय निवडू शकतात. पेमेंट झाल्यावर तिकीट व्हॉट्स ॲप  आणि ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल.