Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Roadside Assistance Service : प्रवासा दरम्यान कार खराब झाल्यास वापरा 'रोड साइड असिस्टंस सेवा'; काही मिनिटांत मिळेल मदत

Roadside Assistance Service on credit card

Image Source : www.investopedia.com

Roadside Assistance Service : बऱ्याचदा दूरच्या प्रवासासाठी कारचा वापर केला जातो. अनेकदा प्रवास चालू असतानाच गाडी खराब होते. अशा परिस्थितीत मदत मिळवणे कठीण होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर 'रोड साइड असिस्टंस सेवा' देण्यात येत आहे. या सेवेबद्दल जाणून घेऊयात.

दूरच्या प्रवासासाठी आपण नेहमीच दु-चाकी ऐवजी चार-चाकी गाड्यांना प्राधान्य देतो. यामुळे प्रवासात कमी थकवा जाणवतो आणि कमी वेळात प्रवास करता येतो. जर तुम्हीही चारचाकी गाडीने प्रवास करत असाल, तर अनेकदा तुमची कार खराब झाली असेल किंवा बंद पडल्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. अशा परिस्थितीत बऱ्याचदा मदत मिळते, तर अनेकदा मिळतही नाही. याच समस्येवर तोडगा म्हणून निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर ‘रोड साइड असिस्टंस सेवा’ (Roadside Assistance Service) देण्यात येत आहे. या सेवेमुळे प्रवासा दरम्यान कार खराब झाली की, अनेक सेवांचा लाभ घेता येतो. रोड साइड असिस्टंस सेवे अंतर्गत कोणकोणत्या सुविधा मिळतात, या सेवेचा लाभ घेण्यासाठी किती खर्च येतो आणि ही सेवा कशी वापरावी याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

रोड साइड असिस्टंस सेवा नक्की काय आहे? त्यामध्ये कोणत्या सुविधा मिळतात?

चार चाकी वाहनांने प्रवास करणारा प्रत्येक व्यक्ती रोड साइड असिस्टंस सेवेचा लाभ घेऊ शकतो. दूरचा प्रवास करताना एक्स्प्रेस वे वर गाडी खराब झाली, तर चालक या सेवे अंतर्गत अनेक सेवांचा लाभ घेऊन त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो.

ही सेवा काही बँकांच्या निवडक क्रेडिट कार्डवर देण्यात येत आहे. या सेवेमध्ये बॅटरी जंम्पस्टार्ट, टायर चेंज करणे, Towing, इंधनाची डिलिव्हरी करणे इ.सुविधा सामील करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस वे वर गाडी खराब झाल्यावर चालक या सेवेच्या मदतीने जवळच्या शहरात किंवा गावात बॅकअप व्हेईकलच्या मदतीने पोहचू शकतात. महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा परवडणारी आहे. खास करून बिकट परिस्थितीत चालकाला यामुळे मदत मिळते.

या सेवेचा वापर कसा करावा?

ही सेवा देणारे क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी या सेवेचा वापर कसा करावा, जाणून घेणे गरजेचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्रेडिट कार्डच्या डेडिकेटेड हेल्पलाइन नंबर वर फोन करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्डचे तपशील ठाऊक असणे आणि ते तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. असिस्टंस सेवा तुम्ही हेल्पलाइन नंबरवर फोन केल्यावर घेता येईल. सेवेसंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला हेल्पलाइन नंबरवरून देण्यात येईल.

सेवेचा लाभ घेण्यासाठी किती खर्च येतो?

रोड साइड असिस्टंस सेवा वाहनाचा विमा खरेदी करताना देखील काढता घेतो. यासाठी पेड सबस्क्रिप्शन घेण्यात येते. ज्याची जवळपास किंमत 2000 रुपये इतकी असते. ही सेवा जास्त खर्चिक नाही. मात्र तरीही लोक या सेवेकडे कानाडोळा करतात. या सेवेचा लाभ बिकट परिस्थितीत घेता येतो. ज्यावेळी याची किंमत कळते. अनेकदा लोक बिकट परिस्थितीत रोड साइड असिस्टंस सेवा न घेतल्याने खूप जास्त पैसे खर्च करतात.

बँकेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि शुल्क

प्रत्येक बँकेच्या क्रेडिट कार्डवरील रोड साइड असिस्टंस सेवा शुल्क वेगवेगळे आहेत. त्या सेवा शुल्कानुसार वेगवेगळ्या सुविधा देण्यात येतात. या सेवेवर आधारित बँक नियम व अटी लागू करतात. काही बँका ठराविक सेवाच देतात. त्यामुळे या सेवेचा लाभ घेण्यापूर्वी नियम व अटी जाणून घेणे गरजेचे आहे.

Source: hindi.moneycontrol.com