Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mother dairy: विदर्भात मदर डेअरीचा मेगा प्रोजेक्ट; 400 कोटींची गुंतवणूक करणार

Milk production

विदर्भात मदर डेअरीचा 400 कोटींचा प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी 10 हेक्टर जमीनही देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल तसेच रोजगार निर्मितीही होईल, असे गडकरी यांनी म्हटले. मदर डेअरी हा सरकारी मालकीचा उपक्रम आहे.

Mother dairy plant in Nagpur: सरकारी मालकीचा मदर डेअरी उद्योग समूह नागपुरात 400 कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन या प्रकल्पातून घेतले जाईल. या प्रकल्पामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांतून 30 लाख लिटर दुधाचे संकलन मदर डेअरीतर्फे केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल आणि दुग्धव्यवसायाची भरभराट होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

24 एकरात उभा राहील प्रकल्प 

नागपूर प्रकल्पात तयार झालेल्या पदार्थांचा पुरवठा देशभरात केला जाणार आहे. नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाबाबतची माहिती रविवारी (4 जून) माध्यमप्रतिनिधींशी बोलताना दिली. सरकार मदर डेअरी प्रकल्पासाठी 10 हेक्टर म्हणजेच 24 एकर जमीन देणार आहे. नागपूरसह गोंदिया, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे.

रोजगार निर्मिती होणार 

विदर्भातील मिहान औद्योगिक प्रकल्पामुळे 68,000 हजार रोजगार निर्मिती झाल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. मदर डेअरी प्रकल्पामुळे परिसरात आणखी रोजगार निर्माण होणार आहे. मदर डेअरी National Dairy Development Board (NDDB) च्या मालकीचा प्रकल्प आहे. NDDB हे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाअंतर्गत येते. 1974 साली मदर डेअरीची स्थापना झाली आहे.

"विदर्भातील दूध संकलनात वाढ होईल"

सध्या विदर्भातील सर्व जिल्ह्यातून 3 लाख लिटर दूध संकलन केले जाते. (Mother dairy plant in Nagpur) मात्र, मदर डेअरी प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे दूध संकलन 30 लाख लिटरपर्यंत जाईल. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दरही मिळेल. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा दूधाचा व्यवसाय नफ्यामध्ये येईल, असे गडकरी म्हणाले. 

भारतात दुधासाठी गाई, म्हशींच्या प्रसिद्ध प्रजाती कोणत्या?

शेतीला जोडधंदा म्हणून भारतामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. पूर्वापार दुधाचा व्यवसाय कौटुंबिक पातळीवर केला जात असे. मात्र, आता अनेक शेतकरी पूर्णवेळ हा व्यवसाय करता दिसून येत आहेत. भारतामध्ये गीर, साहिवाल, सिंधी, थरपारकर, ओंगोल, कांक्रेज या गायींच्या जाती तर निलीराबी, मुरा, म्हैसाणा, जाफराबादी या म्हशींच्या जाती दुग्धउत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. गाईंच्या तुलनेत म्हशींची संख्या फक्त 30% आहे. सहकारी तत्वावरही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. गुजरातमधील अमूल आणि मदर डेअरी हे दुग्ध उत्पादनातील यशस्वी प्रयोग आहेत.