जर तुमचे HDFC बँकेत खाते असेल तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. कारण या महिन्यात ग्राहकांच्या काही सेवा बँकेकडून बंद राहणार आहेत. कुठल्या दिवशी बँकेचे व्यवहार बंद असणार आहेत हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुमच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन ठरवा.
आज एचडीएफसी बँकेच्या वतीने, त्यांच्या ग्राहकांना एक ईमेल केला गेला आहे. कळविण्यात आले आहे की, सिस्टमच्या देखभाल आणि अपग्रेडमुळे जून महिन्यात काही सेवा दोन दिवस बंद राहतील. HDFC बँकेच्या सेवा कधी बंद राहतील याची माहिती ईमेलद्वारे बँकेकडून ग्राहकांना देण्यात आली आहे. बॅंकेकडून सांगण्यात आले की बँकेच्या आयटी सिस्टमची देखभाल आणि अपग्रेडेशनसाठी नियोजितवेळी ग्राहकांना काही सुविधांचा वापर करता येणार नाहीये.
डाउनटाइममुळे ‘या’ सुविधा राहतील बंद
येत्या 10 आणि 18 जून रोजी HDFC बँक खातेधारकांना बँकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम बघणे, पासबुक भरून घेणे, ठेवी जमा करणे तसेच निधी हस्तांतरित करणे या सुविधा वापरता येणार नाही. 10 आणि 18 जून रोजी पहाटे 3 ते सकाळी 6 या वेळेत या तिन्ही सेवा खंडित राहणार आहेत. बँकेने प्रणाली अपग्रेड करण्यासाठी 4 जून रोजी देखील सकाळी 3 ते 6 दरम्यान बँकिंग सेवा बंद ठेवली होती. खरे तर पहाटेच्या वेळी बँकिंग सेवा साधारणपणे कमी वापरल्या जातात, त्यामुळे ग्राहकांना फारसा त्रास सहन करावा लागत नाही.
काय होईल परिणाम?
पहाटेच्या वेळी खरे तर आर्थिक व्यवहार फार कमी प्रमाणात केले जातात. परंतु याच वेळात जर तुम्ही कुणाला पैसे पाठवत असाल किंवा तुमच्या खात्यातील शिल्लक तपासणार आहात तर ते तुम्हांला करता येणार नाहीये. त्यामुळे या वेळात कुठलेही व्यवहार बँकेकडून पूर्ण केले जाणार नाहीयेत. त्यामुळे ग्राहकांनी या वेळेत व्यवहार करू नये असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे शिल्लक तपासा
HDFC बँकेचे ग्राहक 7070022222 हा मोबाईल नंबर सेव्ह करून त्यांच्या खात्याचे अपडेट व्हॉट्सअॅपवर मिळवू शकतात. या नंबरवर ‘Hi’ हा मेसेज केल्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास तुम्हांला घर बसल्या शिल्लक रक्कम तपासता येणार आहे.