विमानाने प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, विमान प्रवास थोडासा खर्चिक असल्यामुळे विमानाचा प्रवास टाळला जातो. मात्र, बजेटचे आणि वेळेच योग्य नियोजन करून तुम्हाला विमान प्रवास शक्य आहे. तसेच तुमचा जर या वर्षभरात विमान प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला स्वस्तात विमानाचे तिकीट बूक करण्याची एक नामी संधी आली आहे. तसेच तुम्हाला अगदी कमी खर्चात विमानातील तुमच्या आवडीचे सीट बूक करता येणार आहे. ज्याची सुरुवात अवघ्या 17 रुपयांपासून होते.
Indigo चा 17 वर्धापन दिन, 17% पर्यंत ऑफर
भारतात विमान सेवा देणाऱ्या विमान कंपन्यापैकी एक असलेल्या इंडिगो (Indigo) एअर लाइन्सकडून आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू करण्यात आली आहे. कंपनी आपला 17 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यासाठी इंडिगो एअर लाइन्सने नागरिकांना तिकिट बुकिंगवर 17% पर्यंत सूट देण्याची ऑफर सुरू केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही किमान 2000 रुपयापर्यंत बचत करू शकणार आहात. तसेच इंडिगोने आपल्या 17 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रवाशांना 17 रुपयांपासून आवडते सीट बुक करण्याचीही ऑफर दिली आहे. मात्र, यासाठी कंपनीने काही नियम व अटी लागू केल्या आहेत.
4 ऑगस्टपर्यंत बुकिंग ऑफर
इंडिगो कंपनीच्या या खास ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना तत्काळ आपल्या विमान प्रवासांची तारीख निश्चित करून तिकीट बुक करावे लागणार आहे. कारण या ऑफरच्या तिकीट बुकींगचा कालावधी अगदी मर्यादित आहे. ज्या प्रवाशांना INDIGO च्या सवलतीचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी 2 ऑगस्ट 2023 ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत आपले तिकीट बुक करायचे आहे.यासाठी तुम्ही हे तिकीट इंडिगो एअर लाइन्सच्या वेबसाइट (www.goindigo.in ) किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून बुक करू शकता. या योजनेतून तुम्ही 09 ऑगस्ट 2023 ते 17 जुलै 2024 या कालावधीतील प्रवासाचा दिवस बुक करू शकता.
12% सवलत 5% कॅशबॅकची संधी
इंडिगोच्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील फ्लाइटच्या तिकीटावर तुम्हाला 12% पर्यंत सवलत मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला"GOINDIGO" प्रोमोकोड वापरून या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. तसेच तिकीट बुकिंगच्या ऑफर कालावधीमध्ये अमेरिकन एक्सप्रेस कार्डधारकांना किमान 5000 रुपयपर्यंतच्या बुकिंगवर 5% म्हणजे 2000 पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळू शकतो. याचबरोबर ग्राहकांकडे HSBC क्रेडिट कार्ड असल्यास त्यांना 3500 रुपयांपर्यंतच्या किमान बुकिंगवर अतिरिक्त 5% कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. जर तुम्ही आजच या ऑफरचा फायदा घेतला तर तुमच्या तिकीट खर्चामध्ये बचत होणार आहे.