Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! UIDAI 'ही' सेवा मोफत देत आहे, तारखेत झाली वाढ!

आधारकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! UIDAI 'ही' सेवा मोफत देत आहे, तारखेत झाली वाढ!

Image Source : www.supportmeindia.com/www.aajtak.com

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आता आधारकार्ड अपडेट करण्याची मुदत 14 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे. ज्या नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाही. ते आता ऑनलाईन त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकणार आहेत.

प्रत्येक आधारकार्ड धारकाने त्यांचे कार्ड दशकातून एकदा तरी अपडेट करण्याचे आवाहन UIDAI ने केले आहे. कारण, असे केल्यास सर्व डेटा अचूक आणि अपडेट राहील. हा उद्देश ठेवून UIDAI ने ज्यांनी आधार कार्ड अजून अपडेट केले नाहीत त्यांना ती मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर आधारकार्ड धारकाला आधार वापरून 10 वर्ष पूर्ण झाले असतील आणि अजूनही त्यांनी त्यांचे आधार अपडेट केले नसेल. तर ते त्यांची माहिती जसे की, ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपडेट आणि अपलोड करू शकतात. ते जर ऑनलाईन या गोष्टी करत असतील तर त्यांना पैसे देण्याची गरज नाही.

अपडेट करण्याची मुदत वाढली!

UIDAI नागरिकांना नेहमची आधार अपडेट करण्यासाठी सांगते. मागील मे महिन्यातही UIDAI ने नागरिकांना आधारमध्ये काही माहिती चुकीची असल्यास ती अपडेट करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ही सुविधा मोफत असून त्याची शेवटची तारीख 14 जून 2023 होती. आता परत तिच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. आता नागरिकांना त्यांचे आधारकार्ड 14 सप्टेंबर 2023 अपडेट करता येणार आहेत. नागरिकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने त्यात अपडेट करता येणार आहे. मात्र, ऑफलाईनसाठी म्हणजे सेंटरवर जाऊन अपडेट करत असल्यास तुम्हाला 50 रुपये आणि बायोमॅट्रीकसाठी 100 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तेच ऑनलाईन कागदपत्रं अपलोड करणं मोफत असणार आहे.

कसे करायचे कागदपत्रं अपलोड?

  • UIDAI च्या पोर्टलवर जा.
  • ‘लॉग इन’ वर क्लिक करा, तुमचा युनिक 12 अंकी आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाका. 
  • त्यानंतर ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा आणि आधारशी कनेक्ट असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाका.
  • आता सर्व्हिसेस टॅबमध्ये ‘अपडेट आधार ऑनलाईन’ निवडा.
  • आता ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करा आणि ते डिटेल निवडा ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे.
  • आधारकार्डमधील तुमचे नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्यांनतर तुम्ही कागदपत्रं अपलोड करून जे बदल करू इच्छिता ते करू शकता.
  • केलेल्या बदलाची पुष्टी करा, तुमची माहिती अपडेट होवून जाईल.