Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan EMI: दोन वर्षात होम लोनचा EMI 20 टक्क्यांनी वाढला; कर्जापेक्षा जास्त व्याज भरण्याची वेळ

Home Loan

Image Source : www.economictimes.indiatimes.com

गृह कर्जदारांसाठी EMI चा बोजा मागील 2 वर्षात 20 टक्क्यांनी वाढला आहे. कर्जाच्या रकमेपेक्षा एकूण व्याज जास्त देण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे. तसेच परवडणाऱ्या घरांची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे. व्याजदर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांना होम लोन महागलं आहे.

Home Loan EMI: मागील दोन-तीन वर्षात भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. कोरोनानंतर परवडणाऱ्या घरांची संख्या कमालीची रोडावली आहे. आरबीआयने व्याजदरामध्ये सतत वाढ केल्याने दोन वर्षात गृहकर्जाचा EMI तब्बल 20% वाढला आहे. त्यामुळे कर्जदारांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. 

1 BHK ची विक्री रोडावली

पुणे, मुंबई सारख्या प्रमुख शहरांत प्रिमियम सेगमेंटमधील घरांची डिमांड वाढत आहे. कारण, जास्त उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांनाच नवे घरं घेण्यास शक्य होत आहे. कोरोनानंतर परवडणारी घरे म्हणजेच 1BHK आणि त्यापेक्षा छोट्या घरांचा पुरवठा कमी झाला आहे. मागणीही रोडावली आहे. कारण, व्याजदर, घरांच्या वाढलेल्या किंमतीमुळे कमी उत्पन्न गटातील ग्राहक घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलत आहेत.

परवडणाऱ्या घरांची विक्री 20 टक्क्यांनी रोडावली

ANAROCK या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने नुकताच एक सर्व्हे केला. यामध्ये परवडणाऱ्या घरांची विक्री 20 टक्के कमी झाल्याचे दिसून आले आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. 2021 मध्ये फ्लोटिंग व्याजदर 6.7% होता. मात्र, मागील दोन वर्षात हा व्याजदर 9.15 टक्क्यांवर पोहचला आहे. 20% वाढीव इएमआय भरण्याची क्षमता अनेक ग्राहकांची नाही.

कर्जापेक्षा जास्त व्याज भरण्याची वेळ

जर 20 वर्षांच्या कालावधीसाठी एखादा ग्राहकाने 30 लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्याला 2021 मध्ये 22,700 EMI भरावा लागत असेल. कारण तेव्हा व्याजदर 6.7% होता. या दराने व्याज आणि कर्जाची रक्कम मिळून ग्राहकाला 54 लाख रुपये भरावे लागले असते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.

आता व्याजदर 9.15 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे 27,300 हप्ता भरावा लागेल. त्यामुळे व्याजासहित एकूण कर्जाचे मूल्य शेवटी 65 लाख रुपये होईल. वाढीव दराने कर्जापेक्षा व्याजच ग्राहकाला जास्त भरावे लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कर्ज घेण्यास उत्सुक नाहीत. परवडणाऱ्या घरांचा इएमआयचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांच्या हाताबाहेर गेला आहे.

2023 च्या पहिल्या 6 महिन्यातील आकडेवारी

चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी-जून कालावधीत देशातील प्रमुख 7 शहरांमध्ये 2.29 घरांची विक्री झाली. त्यापैकी परवडणाऱ्या घरांची संख्या फक्त 46,650 इतकी होती. तर 2022 सालातील पहिल्या सहा महिन्यात 1.84 विक्री झालेल्या घरांपैकी परवडणाऱ्या घरांची संख्या 31% होती. हे प्रमाण कमी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.