येत्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना फाडू सलवत देत आहेत. कालच Amazon ने ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल’ची घोषणा केली आहे. येत्या 5 ऑगस्टपासून सामान्य ग्राहकांना या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 4 ऑगस्टपासून प्राईम मेंबरशीप असलेल्या ग्राहकांना या स्पेशल सेलमध्ये दर्जेदार उत्पादने एकदम दमदार सवलतीत खरेदी करता येणार आहेत.
अॅमेझॉनने ‘Amazon Great Freedom Festival Sale’ची घोषणा करताच फ्लिपकार्टने देखील यात आघाडी घेण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉनचा सेल लाइव्ह होण्याच्या एक दिवस आधीच फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Days) नावाने सेलची घोषणा केली आहे.
ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart 4 ऑगस्टपासून बंपर डिस्काउंट सेल आणत आहेत. Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल नावाचा सेल आणत आहे आणि फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज नावाचा सेल आणत आहे. Amazon चा सेल 4 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे तर फ्लिपकार्टचा सेल 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता संपणार आहे.
?#Amazon Independence Day (SBI Offers)
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 2, 2023
?#Flipkart Big Saving Days (ICICI/Kotak Offers)
? Don't forget to compare Offline prices before pressing that BUY button Note: Surf the Sale offers only if you need, else
? In short avoid unnecessary spends
? ❌✅ pic.twitter.com/IJTU3dWYvw
ग्राहकांची चांदी!
दोन्ही कंपन्यांच्या स्पर्धेत फायदा मात्र ग्राहकांना होणार आहे हे नक्की. दोन्ही कंपन्यांनी आपापल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना इलेक्ट्रोनिक्स वस्तू, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, कपडे, स्मार्ट वॉच,शूज आदी वस्तूंवर 40-60% पर्यंत सवलत दिली जाणार आहे. काही निवडक ब्रांडवर ग्राहकांना तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्याची तयारी सुरू आहे.
फ्लिपकार्टवर खरेदी करताना ICICI बँक आणि Kotak बँकेचे क्रेडीट कार्ड वापरून ग्राहकाला 10% इंस्टंट सवलत देखील दिली जाणार आहे. तर अॅमेझॉनवर खरेदी करताना SBI बँकेचे क्रेडीट कार्ड वापरून ग्राहकाला 10% इंस्टंट सूट मिळू शकणार आहे.