जगभरात काश्मिरी केशराचे (kashmiri saffron ) श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे त्याला मागणीही तशीच आहे. मात्र, काहीवेळा काश्मिरी केशरच्या नावाने ग्राहकांची फसवणूक केली जाण्याचेही प्रकार घडतात. मात्र, यापुढे ग्राहकांना मोठ्या विश्वासाने शुद्ध काश्मिरी केशर खरेदी करता येणार आहे. टाटा समूहाच्या हिमालयन या कंपनीकडून शु्द्ध केशरची विक्री केली जाणार आहे. हिमालयन कंपनी आता ग्रेड 1 चे काश्मिरी केशर(kashmiri saffron) ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे.
ग्रेड 1 हे सर्वात शुद्ध केशर
ग्रेड 1 चे काश्मिरी केशर हे त्याच्या शुद्धतेसाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते. मात्र, ग्राहकांना भारतात उपलब्ध असलेल्या केशरमधून नक्की शुद्ध केशर कोणते ते कसे ओळखायचे या माहितीचा अभाव आहे. केशरचे गुणवत्तेनुसार 1 ते 4 स्केलवर वर्गीकरण केले जाते, ज्यामध्ये ग्रेड 1 हे सर्वात शुद्ध दर्जा समजला जातो. आता टाटाच्या हिमालयन या कंपनीकडून ग्रेड 1 चे काश्मिरी केशर जे 100% शुद्ध आहे ते ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शुद्धता पडताळणीसाठी QR कोड
टाटाची उत्पादने ही ग्राहकांचा विश्वास जपणारी उत्पादने असतात. त्याच प्रमाणे हिमालयन केशरच्या प्रत्येक पॅकवर या ग्रेड 1 च्या केशरवर कशा प्रक्रिया कशी केली जाते. याची माहिती देण्यासाठी एक QR कोड देण्यात आला आहे. ग्राहक तो कोड स्कॅन करून केशरची माहिती घेऊ शकणार आहेत.या व्यतिरिक्त, या काश्मिरी केशरच्या पॅकवर बॅच क्रमांक टाकण्यात आला असून काश्मिरी केशरच्या शुद्धतेचे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून शुद्धता आणि ग्रेड 1 दर्शवणारे गुणवत्ता प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.
किंमत किती?
टाटाचे प्रोडक्ट म्हणजे शुद्धतेविषयी शंका निर्माण होणार नाहीच. शिवाय हिमालयनकडूनही ती काळजी घेण्यात आली आहे. आता हिमालयन कंपनीकडून हे 100 टक्के शुद्ध क्वॉलिटीचे काश्मिरी केशर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रतिगॅम 650 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 0.5 ग्रॅम केशरचे पॅक घेण्यासाठी 370 रुपये किंमत असेल. हे शुद्ध काश्मिरी केशर ग्राहकांना भारतातील निवडक प्रीमियम आउटलेट्समध्ये तसेच, आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाईट आणि टाटाच्या www.tatanutrikorner.com. या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहेत.