जागतिक अर्थव्यवस्था आज चांगल्या स्थितीत आहे. IMF ने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, असेही जेनेट येलन म्हणाल्या.अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलन भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बंगळुरू येथे भेट घेतली. या बैठकीनंतर अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले की, युक्रेनच्या मुद्द्यावर आमची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही या लढ्यात युक्रेनच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची प्रशंसा करतो. आम्ही युक्रेनला सतत मदत करण्याबद्दल बोललो.
रशियाचा लष्करी उद्योग कमकुवत करण्याचा उद्देश
जॅनेट येलेन यांनी सांगितले की, रशियाचा लष्करी उद्योग कमकुवत करणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरून त्यांचा महसूल कमी होईल आणि ते युद्धासाठी निधी देऊ शकत नाहीत. रशियन सैन्य 9,000 हून अधिक सैन्य उपकरणे बदलण्यासाठी धडपडत आहे. येलेन म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था आज चांगल्या स्थितीत आहे. IMF ने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. जगभर महागाईही कमी होत आहे.जेनेट येलेन यांनी सांगितले की, G20 चा उद्देश कर्ज, हवामान बदल आणि बहुपक्षीय विकास बँकांना पुढे नेणे हा आहे. विकसनशील देशांसाठी कर्ज प्रणाली सुधारण्यासाठी आम्ही चीनसह सर्व अधिकृत कर्जदारांशी चर्चा करू.
भारताच्या अध्यक्षतेखाली G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) ची बैठक 24-25 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन भारतात आल्या आहेत. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जेनेट येलेन यांनी 'G20 फायनान्स ट्रेक'च्या प्राधान्यक्रमांवर चर्चा केली. "दोन्ही नेत्यांनी क्रिप्टो मालमत्ता आणि आरोग्य यांसारख्या विषयांव्यतिरिक्त बहुपक्षीय विकास बँका, जागतिक कर्ज संवेदनशीलता, 'जस्ट एनर्जी ट्रान्झिशन पार्टनरशिप (GETP)' बळकट करण्याबद्दल चर्चा केली,’’ असे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
जेनेट येलेन यांच्याविषयी..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या मंत्रिमंडळात महिलांकडेही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आहे. अमेरिकेच्या अर्थ खात्याची जबाबदारी जेनेट येलेन यांच्यावर टाकण्यात आली. सिनेटने बायडन यांच्या मंत्रिमंडळाला मान्यता दिली यामुळे त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान मिळवलेला आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. बेरोजगारांची संख्या अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा स्थितीत तेव्हा अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर आणणे आणि बेरोजगारी कमी करणे ही आव्हाने जेनेट येलेन यांच्यासमोर होती. त्यांना आर्थिक प्रश्नांची चांगली जाण असल्याचे सांगितले जाते. बायडन यांच्या सरकारचे आर्थिक धोरण ठरवण्यात आणि एक दिशा देण्याच्या कामी जेनेट येलेन निर्णायक भूमिका बजावत आहेत.
त्यांनी यापूर्वी अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या गर्व्हनर म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. जेनेट येलेन यांनी 2014 ते 2018 या दरम्यान अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या गर्व्हनर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याआधी त्या 1997ते 1999 या कालखंडात व्हाइट हाउसच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष देखील होत्या. फेडरल रिझर्व्हच्या त्या पहिल्या महिला गर्व्हनर होत्या. अमेरिकेच्या अर्थमंत्री म्हणून येलेन यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली तेव्हाच शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. करोनामुळे कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे मोठे आव्हान येलेन यांच्यासमोर होते.