जागतिक बँकेच्या प्रमुखपदासाठी अजय बंगा यांची शिफारस अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने केली आहे. अजय बंगा (Ajay Banga nominated for World Bank head) यांचा जन्म पुण्यातील खडकी येथे झाला असून सध्या ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मास्टरकार्ड, सिटीग्रूप, पेप्सिको, नेसले या बड्या खासगी कंपन्यांमधील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. पर्यावरण बदल आणि जागतिक स्तरावरील उपक्रमांसाठी निधी जमा करण्याची क्षमता बंगा यांच्यामध्ये असल्यामुळे बायडेन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली.
पुण्यातील खडकी येथे जन्म (Ajay Banga birthplace)
अजय बंगा हे मुळचे पंजाबमधील जालंधर येथील आहेत. मात्र, त्यांचे वडील पुण्यातील खडकी येथे लष्करी अधिकारी होते. खडकी कंन्टोनमेंट येथेच त्यांचा जन्म झाला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी परदेशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळल्या आहेत. मास्टर कार्ड कंपनीचे सीइओ म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या कंपनीमध्ये त्यांनी 12 वर्ष काम केले आहे.
बायडेन यांच्या शिफारसीला विरोध (Opposition on Biden decision to nominate Ajay Banga)
दरम्यान, अजय बंगा यांच्या शिफारसीला काही जणांकडून विरोध होत आहे. बंगा यांनी फक्त खासगी कंपन्यांमध्ये काम केले आहे. या खासगी कंपन्या पर्यावरण रक्षणासाठी नाही तर पर्यावरणाच्या र्हासासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे ही शिफारस मागे घ्यावी, अशीही मागणी होत आहे. अमेरिकेने बांगा यांची शिफारस केली असून इतरही देश उमेदवारांची शिफारस करणार आहेत. 29 मार्च ही शिफारस करण्याची शेवटची तारीख आहे. जागतिक बँकेच्या प्रमुखपदी महिलेची अद्याप निवड झाली नाही, त्यामुळे महिला सदस्याने या कामाची धुरा सांभाळावी, असे जर्मनीने म्हटले आहे.
जागतिक स्तरावर कामाचा अनुभव (Ajay Banga Experience)
जागतिक बँकेकडून जगभरात पर्यावरण रक्षण आणि गरीब देशांमध्ये सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. हा निधी गोळा करण्यामध्ये Word Bank च्या प्रमुखाची महत्त्वाची भूमिका असते. कॉर्पोरेट्स कंपन्या, विविध देशांचे प्रमुख, संघटनांशी चांगले संबंध असणाऱ्या व्यक्तीच्या या पदी नियुक्ती केली जाते. बंगा यांचा खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये धुरा सांभाळली आहे. तसेच मास्टर कार्डमध्ये असताना आर्थिक समावेशकता आणि पर्यावरण बदल या गोष्टींवर काम केले आहे.
मे महिन्यात नव्या प्रमुखाची निवड( Word bank New Head)
David Malpass हे जागतिक बँकेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मात्र, त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. जागतिक बँकेने हाती घेतलेल्या उपक्रमांवरुन त्यांची कारकीर्द वादात सापडली आहे. मे महिन्यामध्ये नव्या प्रमुखाची निवड होणार आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यांशी सहकार्य करुन काम करण्याची हातोटी बांगा यांच्याकडे असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.
जागतिक बँकेत अमेरिकेचा सर्वाधिक हिस्सा आहे. तसेच अमेरिकेतील व्यक्तीचीच पूर्वीपासून बँकेच्या प्रमुखपदी निवड होत असे. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या प्रमुखपदी युरोपियन व्यक्तीची निवड होत असे. मात्र, आता विकसनशील देशांचा दबाव वाढत असल्याने प्रमुख पदासाठी इतर सदस्यांचाही विचार होत आहे.