Pangolin scales seized in Mumbai: मुंबईमध्ये खवल्या मांजरांची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडे 30 किलोंचे या संरक्षीत प्रजातीतील मांजरांचे खवले (स्केल) आढळून आले. या खवल्यांची किंमत तब्बल 30 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी मुंबई पोलिसांनी रायगड येथील राम वाघमारे या 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली.
आरोपी हा रायगड जिल्ह्यातील कोलाल या गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे शाखेच्या शाखा 10 ला पँगोलीन म्हणजेच खवल्या मांजरांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सापळा लावून आरोपीला अटक केली. मरोळ भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे गोणीमध्ये 30 किलोचे खवले आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
“आरोपी हा वन परिसरात राहणार आहे. त्याच्याकडे brown pangolin scales चे खवले आढळून आले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे”, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यप्राणी संरक्षण कायद्याखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे.
1 किलो खवल्याची किंमत 1 लाख रुपये (pangolin scales price)
खवले माजंराला scaly anteater म्हणजेच मुंग्या खाणारा असेही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या प्राण्याच्या खवल्यांना 1 किलोला 1 लाख रुपये भाव मिळतो. पँगोलीनला सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी समजले जाते. (Pangolin scales seized in Mumbai) 2018 ते 2022 याकाळात 1200 पॅंगोलीनची भारतातून तस्करी झाल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. या प्राण्याच्या तस्करीवर कायदेशीर बंदी आहे.
खवल्यांचा वापर कशासाठी होतो (Use of pangolin scales)
पारंपारिक आशियाई औषधांमध्ये, विशेषतः चीन आणि व्हिएतनाममध्ये खवल्यांचा वापर केला जातो. खवले हृदयविकारापासून कर्करोगापर्यंत आजारांवर इलाज आहेत, असे समजले जाते. मात्र, या सगळ्या गोष्टींबद्दल वैज्ञानिक पुरावा नाही. गेंड्याचे शिंग आणि मानवी नखांप्रमाणे, खवले मांजर स्केल (खवले) केराटिनपासून बनलेले असतात आणि त्याचा औषधी प्रभाव असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही. पारंपरिक आफ्रिकन औषधांमध्ये देखील, विशेषत: पश्चिम आणि मध्य-आफ्रिकेत, या खवल्यांचा आढळतो.