• 27 Mar, 2023 06:33

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 Most Expensive Paintings in the World: ‘ही’ आहेत जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्ज

Top 5 Most Expensive Paintings in the world

Image Source : www.tophindistory.org

Top 5 Most Expensive Paintings in the World: जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्जमध्ये कोणती चित्रं येतात, ती कधी आणि कोणी बनवली, त्याची किंमत काय होती अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.

आपल्या लहापणीच्या आवडत्या छंदापैकी एक छंद म्हणजे चित्र (Painting) काढणं. बरेच जण हाच छंद जोपासून त्यासंदर्भातील इत्यंभूत प्रशिक्षण घेतात आणि त्याला करियर म्हणून एक नवी ओळख देतात. अनेक जण रविवारच्या सुट्टीचा वेळ चित्रं काढण्यात किंवा पाहण्यात घालवतात. भारतातील प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन (M. F. Hussain) यांची चित्रं सर्वात महागडी पेंटिंग म्हणून ओळखली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात महागड्या 5 पेंटिग्ज मध्ये एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांचा उल्लेख नाहीये.

www.tophindistory.org या वेबसाईटने जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्ज बद्दल माहिती दिली आहे. ही पेंटिंग्ज नक्की कोणाची आहेत आणि त्यांची किंमत काय अशी सर्व माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Nafea FAA ipoipo (1892)

Nafea FAA ipoipo
www.tophindistory.org

जगातील सर्वात महागड्या पेंटिंग्जमध्ये पहिल्या क्रमांकावर Nafea FAA ipoipo ला ओळखले जाते. हे चित्र दोन महिलांचे आहे. Nafea FAA ipoipo याचा अर्थ when will you marry me असा होतो. हे चित्र 1892 मध्ये पॉल गॉगुइन (Paul Gauguin) नावाच्या चित्रकाराने बनवले होते.

2015 मध्ये अॅडॉल्फ स्टेशन फॅमिली ट्रस्टने (Adolph Station Family Trust) आयोजित केलेल्या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये या पेंटिंगची खरी किंमत लोकांना कळाली. कतारच्या संग्रहालयाने हे पेंटिंग 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सध्याच्या भारतीय चलनानुसार जवळपास 248,69,19,000 रुपयांना खरेदी केले.

The card players (1892)

The card players
www.tophindistory.org

The card players हे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या पेंटिंग पैकी एक आहे. द कार्ड प्लेयर नावाची पेंटिंग 1892 मध्ये पॉल सेझन (Paul Cézanne) नावाच्या चित्रकाराने तयार केली होती. नावाप्रमाणेच, द कार्ड प्लेयर्स पेंटिंगमध्ये दोन लोक पत्ते खेळताना दाखवण्यात आले आहेत.  

या पेंटिंगमध्ये दोन रंगांच्या टोनचा सुंदर मेळ घालण्यात आला आहे. 2011 मध्ये, जॉर्ज एम्बिरिकोस (George Embiricos) नावाच्या चित्रकाराने हे पेंटिंग कतारच्या रॉयल फॅमिलीला 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकले होते. ज्याची सध्याच्या भारतीय चलनानुसार 207,24,32,500 रुपये इतकी किंमत आहे.

Adele Bloch Boyer (1907)

Adele Bloch Boyer
www.tophindistory.org


Adele Bloch Boyer या पेंटिंगला जगातील तिसरे सर्वात महागडे पेंटिंग असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. हे चित्र इतिहासातील सर्वात दुर्मिळ चित्रांपैकी एक असून तज्ञांच्या मते, असे मानले जाते की, अशी पेंटिंग क्वचितच तयार केली जातात.

या चित्रात एका महिलेचे चित्रण करण्यात आले आहे. हे पेंटिंग इतके सुंदर बनवण्यात आले आहे, की हे पेंटिंग जगातील एकमेव मास्टर पीस म्हणून गणले जाते. 1907 मध्ये गुस्ताव क्लिमट (Gustav Klimt) यांनी हे पेंटिंग बनवले होते.

2006 मध्ये, रोनाल्ड लॉडरने (Ronald Lauder) हे पेंटिंग एका अज्ञात व्यक्तीला 158 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकले. सध्याच्या भारतीय चलनानुसार त्याची किंमत  130,97,77,340 रुपये इतकी आहे.

Three studies of Lucian Freud (1969)

Three studies of Lucian Freud
www.tophindistory.org

Three studies of Lucian Freud हे पेंटिंग चौथे महागडे पेंटिंग आहे.  याचे तीन वेगवेगळे भाग आपल्याला पाहायला मिळतात. हे चित्र फ्रान्सिस बेकन (Francis Bacon) नावाच्या चित्रकाराने 1969 साली काढले होते. ही चित्रकला समकालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणून ओळखली जाते.

फ्रान्सिस्को बेकन यांनी 2013 मध्ये हे पेंटिंग एका अज्ञात व्यक्तीला 145 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकले होते. ज्याची सध्याच्या भारतीय चलनानुसार 120,20,10,850 रुपये इतकी किंमत आहे.

Number 5'' (1998)

Number 5''
www.tophindistory.org

"Number 5" नावाचे हे पेंटिंग एक सुंदर कलाकृती असून वेगवेगळ्या रंगांचा एक अनोखा नमुना म्हणून पाहायला मिळत आहे. हे पेंटिंग जॅक्सन पोलॉक (Jackson Pollock) या चित्रकाराने 1948 मध्ये बनवले होते. कालांतराने 2006 मध्ये डेव्हिड गेफेन (David Geffen) यांनी हे पेंटिंग एका अज्ञात व्यक्तीला 140 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकले. ज्याची सध्याच्या भारतीय चलनानुसार 116,05,62, 200 रुपये इतकी किंमत आहे.

काहींचे मते, ही पेंटिंग विकत घेणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून मेक्सिकन महिला उद्योगपती डेव्हिड मार्टिनेज (David Martinez) होती. मात्र यावर कोणतीही खात्रीदायक माहिती उपलब्ध नाही.