• 31 Mar, 2023 09:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cricket Bat बनविणारे Jammu Kashmir मधील व्यावसायिक अडचणीत, कच्चा माल मिळत नसल्याने हैराण

Cricket Bat

काश्मीरमध्ये बनवलेल्या बॅट खूप स्वस्त असतात, त्यामुळे जगभरात त्याला मागणी असते. विलोच्या लाकडापासून बनवलेल्या बॅटची गुणवत्ता ब्रिटनमध्ये बनलेल्या विलो बॅट्सइतकीच चांगली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 400 क्रिकेट बॅट निर्मिती युनिट आहेत मात्र कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे हे युनिट चालवणे कठीण बनले आहे.

काश्मीरमधील जवळपास 100 वर्षे जुन्या क्रिकेट बॅट उद्योगाला कच्च्या मालाची तीव्र टंचाई सध्या जाणवत आहे. राज्यात चांगल्या प्रतीचे विलो लाकूड उपलब्ध नसल्यामुळे परंपरागत क्रिकेट बॅट बनविणारे व्यावसायिक हैराण आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 400 क्रिकेट बॅट निर्मिती युनिट आहेत.कच्चा मालाचा पुरवठा नसल्यामुळे हे युनिट चालवणे कठीण बनले आहे. काश्मीरच्या क्रिकेट बॅट्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे (Cricket Bats Manufacturing Association) प्रवक्ते फवझुल कबीर म्हणाले की, विलो लाकडाचा साठा झपाट्याने कमी होत आहे.त्यामुळे बॅट बनविणे जिकिरीचे बनले आहे. देशभरातून बॅटसाठी मागणी असतानाही लाकडाचा तुटवडा असल्याने मालाची निर्मिती होत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.क्रिकेट बॅट बनविणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ जम्मू- काश्मीरमध्ये आहे असे मानले जाते. 

विलो झाडाला परिपक्व होण्यासाठी किमान 10 वर्षे लागतात. तसेच कमी वयाच्या झाडाच्या लाकडापासून चांगल्या प्रतीची बॅट बनत नाही. परंतु सध्या 10 वर्षे जुने विलोचे झाड शोधणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे नाईलाजाने 5 वर्षे जुने विलोचे झाड तोडावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. हे देखील येत्या काही वर्षांत उपलब्ध होणार नाही, अशी काळजी देखील बॅट निर्मिती युनिट चालवणारे व्यावसायिक व्यक्त करत आहे.

काश्मीरमध्ये बनवलेल्या बॅट खूप स्वस्त आहेत, त्यामुळे जगभरात मागणी जास्त आहे. क्रिकेट बॅट्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ काश्मीरच्या मते, विलोच्या लाकडापासून बनवलेल्या बॅटची गुणवत्ता ब्रिटनमध्ये बनलेल्या विलो बॅट्सइतकीच चांगली आहे. कबीर म्हणाले की, 'इंग्लंडमध्ये बनवलेल्या एका बॅटची किंमत लाखांमध्ये आहे, तर आम्ही एका बॅटसाठी फक्त 1-3 हजार रुपये घेतो. त्यामुळे जगभरात काश्मीरमधील बॅटला मागणी अधिक प्रमाणात असते.

30 लाख क्रिकेट बॅट्सची निर्यात!

काश्मीरमधून दरवर्षी सुमारे 30 लाख क्रिकेट बॅट्सची निर्यात होत असते. मोठ्या प्रमाणात बॅटसाठी ऑर्डर मिळत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यांचे उत्पादन दुप्पट होऊ शकते, परंतु  लाकूडच उपलब्ध नसल्याने त्यांना पुरवठा करता येत नाहीये.

एका बॅटची किंमत 3,000 रुपयांपर्यंत!

कबीर म्हणाले, 'एकेकाळी आम्ही 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत बॅट विकायचो. सध्या ते आयसीसीच्या मानकांनुसार एका बॅटसाठी 3,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात.विलो लाकूड वजनाला हलके असते मात्र टनक असते. त्याचा वापर कालावधी इतर लाकडांच्या तुलनेत अधिक असतो. फर्निचर बनविण्यासाठी देखील या लाकडाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मध्य आशिया आणि युरोप देशांत हे झाड बघायला मिळते. लाकडाची वाढती मागणी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जाते. परंतु लाकूड परिपक्व होण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागत असल्यामुळे लाकडाची आवक मंदावली आहे.