हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी या वर्षी पॅसिफिक महासागर (Pacific Ocean) क्षेत्रात अल निनो (El Nino) इफेक्ट परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जानेवारीत आपल्या मासिक आर्थिक आढावा अहवालात म्हटले आहे की, जर एल निनोच्या पुनरागमनाशी संबंधित हे अंदाज खरे ठरले तर यावर्षी भारतात मान्सूनचे खराब प्रदर्शन होऊ शकते.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर यंदाच्या फेब्रुवारीत उष्णतेचे अनेक विक्रम मोडू शकतात. फेब्रुवारीचे शेवटचे चार दिवस म्हणजे 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत तापमान 31 ते 32 अंशांवर जाऊ शकते असा अंदाज आहे. असे झाल्यास, दशकातील हा पहिला फेब्रुवारी असेल जेव्हा सात दिवस तापमान 30 अंशांपेक्षा जास्त असेल. असे झाल्यास, हा एक दशकातील सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरणार आहे. एवढेच नव्हे तर मार्चच्या सुरुवातीला देखील दिलासा मिळण्याची शक्यता नाहीये. त्याचवेळी, काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी या वर्षी पॅसिफिक महासागर (Pacific Ocean) क्षेत्रात अल निनो (El Nino) इफेक्ट परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जानेवारीत आपल्या मासिक आर्थिक आढावा अहवालात म्हटले आहे की, जर एल निनोच्या पुनरागमनाशी संबंधित हे अंदाज बरोबर असतील तर यावर्षी भारतात खराब मान्सूनचा अंदाज लावला जाऊ शकतो. यामुळे आर्थिक वर्ष 2024 मध्ये उत्पादनात घट आणि किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आज मुंबईत हवामान कसे असेल? मुंबई आज शनिवारी आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान 34 पर्यंत तर किमान तापमान 24 अंशांपर्यंत राहू शकते. 26 फेब्रुवारी रोजी ते 36 अंशांपर्यंत वाढेल जाण्याची शक्यता आहे. यानंतर 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी तापमान 36 अंश असेल. मार्चच्या सुरुवातीला 1 आणि 2 मार्च रोजी कमाल तापमान 34 ते 36 अंशांच्या दरम्यान राहू शकते. दरम्यान पावसाची शक्यता नाही असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत सरासरीपेक्षा 45 टक्के कमी पाऊस हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यात सामान्यपेक्षा 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. हे मूल्यांकन 1 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान आहे. यादरम्यान राजधानीत 20.4 मिमी पाऊस झाला. हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा 16.5 टक्के कमी आहे. त्याच वेळी, या कालावधीत देशभरात 40 टक्के कमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस मध्य भारतात 86 टक्के कमी पाऊस, पूर्व आणि ईशान्य भारतात 66 टक्के, दक्षिण द्वीपकल्पात 56 टक्के आणि वायव्य भारतात 20 टक्के कमी पाऊस पडला.
एल निनो (El Nino) म्हणजे काय? एल निनो हा हवामानाचा एक नमुना आहे. त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. यामध्ये समुद्राचे तापमान तीन ते चार अंशांनी वाढते. त्याचा परिणाम 10 वर्षांत दोनदा होताना दिसतो. या प्रभावामुळे जास्त पावसाच्या भागात कमी पाऊस आणि कमी पावसाच्या भागात जास्त पाऊस पडतो. एल निनोमुळे भारतात मान्सून अनेकदा खराब कामगिरी दर्शवत असतो. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.
उत्पादन कमी झाले तर महागाई वाढणार!अर्थ मंत्रालयाच्या पुनरावलोकन अहवालात असे म्हटले आहे की काही हवामान संस्थांनी यावर्षी भारतात अल निनो स्थिती परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर पावसाळ्यात पाऊस कमी पडू शकतो. यामुळे कृषी उत्पादनात घट होऊन भाव वाढू शकतात. तथापि, FY2024 मध्ये भारतासाठी महागाईचा धोका कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच महागाई वाढण्याचा धोका असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. याचे कारण म्हणजे ज्या प्रकारे भू-राजकीय परिस्थिती आहे, जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आहे, त्याचप्रमाणे जगभर ज्या प्रकारे व्याजदर वाढत आहेत, त्यामुळे महागाईचा धोका कायमच राहणार आहे.
वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे. पुण्यातील खडकी कंन्टोनमेंट येथे त्यांचा जन्म झाला आहे.
बनावट आणि भेसळयुक्त औषधे तयार करणाऱ्या 76 कंपन्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालायने कारवाई केली आहे. मागील काही दिवासांपूर्वी गांबिया आणि उझबेकिस्तान देशांमध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांच्या मृत्यूस भारतीय कंपन्यांनी तयार केलेले औषध जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही देशांनी केला होता. त्यानंतर भारत सरकारने बनावट कंपन्यांना शोधण्याचे अभियान राबवले होते.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.