दिवसेंदिवस होम लोनवरील कर्जाचे व्याजदर वाढत आहे. त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची मागणी देखील कमी होऊ लागली आहे. तरीही 2023 यावर्षात भारतातील प्रमुख शहरांमधून अहमदबाद हे परवडणाऱ्या घरांच्या किमतीत पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. या यादीत महाराष्ट्रातीलही एका प्रमुख शहराचा समावेश झाला आहे.
Knight Frank India's Affordability Index 2023 मध्ये भारतातील कोणत्या शहरात परवडणारी घरे सर्वाधिक उपलब्ध आहेत. असा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये देशातील टॉप 8 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत 23 टक्क्यांनी अहमदाबाद हे परवडणाऱ्या घरांसाठी पहिल्या क्रमांकावर आले आहे. अहमदाबादनंतर कोलकाता आणि पुणे ही दोन शहरे 26 टक्क्यांच्या गुणांनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर चेन्नई, बंगळुरु, नवी दिल्ली, हैदराबाद आणि सर्वांत शेवटी मुंबईचा क्रमांक लागतो.
आरबीआयने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत रेपो दरामध्ये 250 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. यामुळे होमलोनचे व्याजदरही वाढले होते. परिणामी कर्जाची मागणी कमी झाली होती. यामुळे रिअल इस्टेट मार्केट पूर्णपणे थंड पडले होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. आरबीआयने पतधोरणाच्या मागील दोन बैठकीनंतर रेपो दरामध्ये कोणतीही वाढ केली आहे. त्यामुळे होम लोन देणाऱ्या बँकांनीही कर्जाचे व्याजदर जैसे थे ठेवल्याचे दिसून येते. तरीही परवडणाऱ्या घरांच्या मागणीवर झाल्याचे दिसून येते.
परवडणाऱ्या किमतीत घरांच्या उपलब्धतेत मुंबई सर्वांत तळाला आहे. म्हणजेच मुंबईत घर विकत घेणे हे परवडणारे नाही आणि परवडणारी घरेसुद्धा मुंबईत उपलब्ध नाहीत. या शहरातील घरांची मागणी एका वेगळ्या वळणावर गेली आहे. त्यामुळे लहान जागेतील आणि परवडणारी घरेच बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात बांधली जात नाहीत. मुंबईनंतर हैदराबाद, नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या शहरांचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राचा विचार करता मुंबईनंतर राहण्यासाठी सर्वाधिक पसंती दिली जाणारे शहर पुणे आहे. पुण्याची मागणी मोठी आहे. पण आता पुण्याचा विस्तारदेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने इथे महागड्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची मागणीदेखील वाढू लागली आहे.