गुंतवणुकीत रिस्क आहे, रिस्क घेतली तरच काहीतरी चांगले होईल हा समज पहिले काढून टाका. कारण, अधिक रिस्क, अधिक पैसा असला तरी, तुमच्या रिस्कनुसार आणि ध्येयानुसारच गुंतवणुकीचे प्लॅनिंग करा. मार्केटची अस्थिरता आणि बदलत्या ट्रेंडमुळे मार्केट ढासळू शकते. त्यासाठीच गुंतवणूक करताना दूरदृष्टी ठेवून, दीर्घ मुदतीचे महत्व जाणून घेणे महत्वाचे आहे. तरच दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो.
रिसर्च आहे महत्वाचा
कोणतीही माहिती न घेता मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उतरल्यास, मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये उतरण्याआधी मार्केट रिसर्च आवश्यक आहे. त्यामुळे मार्केटच्या छोट्या-मोठ्या गोष्टी समजायला मदत होते. तसेच, तोटा होण्याची शक्यता कमी होते आणि अधिक रिटर्न कसा मिळवता येईल यासाठी नवे मार्ग सापडतात. त्यामुळे गुंतवणुकीच्याआधी मार्केट रिसर्च केल्यास बराच फायदा होऊ शकतो.
दीर्घ मुदतीसाठी करा गुंतवणूक
आत्तापर्यंत सर्वच स्तरातून दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला रिटर्न मिळाल्याचे दिसून आले आहे. तसेच मार्केटमध्ये छोटी उलथापालथ अल्प मुदतीच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकते, त्यामुळे दीर्घ मुदतीवर गुंतवणुकीसाठी तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. त्यामुळे तुमचा फायदा होईल आणि अधिक रिटर्न मिळायला मदत होईल.
पोर्टफोलीओत एकावरच नको फोकस
गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता, विविध ठिकाणी केल्यास यशस्वी होण्याची संधी वाढते. त्यामुळे गुंतवणूक करताना, काॅर्पोरेट बाॅंड, डेब्ट, स्टार्टअप इक्विटी, रिअल इस्टेट या ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तोटा होण्याचा धोका कमी होतो. तसेच, गुंतवणुकीचे वेगवेगळे प्लॅटफाॅर्म असल्याने चांगला रिटर्न मिळायलाही मदत होते.