Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD Tax Rules : एफडी गुंतवणूकदारांसाठी अलर्ट! ITR भरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बसेल दंडाचा फटका

FD Tax Rules

FD Tax Rules : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे, पण एफडीतून मिळणाऱ्या व्याजावर कर लागतो. टीडीएस टाळण्यासाठी फॉर्म 15G/ 15H कसा वापरावा आणि आयटीआरमध्ये (ITR) उत्पन्न का दाखवावे, जाणून घ्या.

उत्पन्न कर बचत आणि सुरक्षित परतावा देणारी गुंतवणूक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट होय. भारतीय गुंतवणूकदार याला सर्वात आश्वासक पर्याय मानतात. एफडी तुम्हाला कमी वेळेत निश्चित व्याज देते. पण एफडीतून मिळणारे व्याज करपात्र उत्पन्न मानले जाते. उत्पन्न कर विभागाकडून नोटीस येऊ नये यासाठी टीडीएस कपात, पॅन कार्ड आणि फॉर्म 15G / 15H यांच्याशी संबंधित नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

टीडीएस कपात आणि पॅन कार्डचे महत्त्व

एफडीवर मिळणारे व्याज तुमच्या कर स्लॅबनुसार करपात्र असते. जर एका आर्थिक वर्षात एफडीचे व्याज उत्पन्न ₹40,000 रुपयांपेक्षा जास्त झाले (ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹50,000 रुपयांपेक्षा जास्त), तर बँक त्यावर स्रोतस्थानी कर कपात (टीडीएस) करते.

टीडीएस वाढण्याचा धोका: उत्पन्न कर अधिनियमाच्या कलम 194A नुसार, एफडी खात्यामध्ये पॅन कार्ड अपडेट नसल्यास, बँक टीडीएसचा दर 10% वरून वाढवून 20% करतो. त्यामुळे एफडी सुरू करण्यापूर्वी बँकेत पॅन अपडेट करा.

टीडीएस टाळण्यासाठी फॉर्म 15G / 15H चा वापर

गुंतवणूकदारांचे उत्पन्न कर स्लॅबपेक्षा कमी असेल, तर त्यांना टीडीएस कपात टाळता येते. यासाठी व्याज कपात होण्यापूर्वीच बँकेत जाऊन फॉर्म 15G / 15H जमा करणे आवश्यक आहे.

फॉर्म 15G: हा फॉर्म 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी असतो.

फॉर्म 15H: हा फॉर्म 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असतो.

एफडीचे उत्पन्न आयटीआरमध्ये दाखवणे अनिवार्य

अनेक गुंतवणूकदारांना वाटते की टीडीएस कपात झाली असल्याने आयटीआर (ITR) भरताना एफडीचे व्याज उत्पन्न दाखवण्याची गरज नाही. परंतु ही समजूत चुकीची आहे. आयटीआर भरताना एफडीतून झालेली कमाई उत्पन्न कर विभागाला सांगणे अनिवार्य आहे. एफडीच्या व्याजाचे उत्पन्न आयटीआरमध्ये कधीही लपवू नका, अन्यथा दंड बसू शकतो.

गुंतवणुकीचे कालावधी आणि इतर फायदे

एफडी गुंतवणुकीचा कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत निश्चित केला जाऊ शकतो. बहुतेक बँकांमध्ये किमान गुंतवणूक ₹1,000 ते ₹10,000 रुपयांपर्यंत असते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदा: ज्येष्ठ नागरिकांना सामान्यतः इतर ग्राहकांपेक्षा जास्त व्याजदर दिला जातो, ज्यामुळे निवृत्त लोकांसाठी एफडी उत्तम पर्याय ठरते.

टॅक्स सेव्हिंग एफडी: कर बचत करायची असल्यास, टॅक्स सेव्हिंग एफडीत गुंतवणूक करा. यात उत्पन्न कर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.

जर एफडी मॅच्यूरिटी पूर्वी तोडली तर बँक दंड लावतात किंवा कमी व्याजदर लागू करतात, हे लक्षात ठेवा.