देशभरात सध्या महागाईची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिक हैराण असताच आता कांदे, बटाटे, फळे, कडधान्ये देखील महागली आहेत. किरकोळ महागाईने जुलै 2023 या महिन्यात 7.44 टक्क्यांचा आकडा गाठला आहे. सततच्या वाढत्या किरकोळ महागाई दराने सामान्यांना रोजचा खर्च भागवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
महागाईचे कारण काय?
पावसाळा सुरु झाल्यानंतर किरकोळ महागाई दरात सातत्याने वाढ होताना दिसते आहे. देशातील किरकोळ महागाईने गेल्या 15 महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. याचा थेट परिणाम समानता नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम वर्गावर पहायला मिळतो आहे. या महागाईचे मुख्य कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यात असलेली तफावत.
पावसाळा सुरु झाल्यापासून टोमॅटो व इतर हिरव्या पालेभाज्या प्रचंड महागल्या आहेत. टोमॅटोने तर सामान्यांना जेरीस आणले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे अशा काही शहरांमध्ये अजूनही टोमॅटो 140-150 रुपये किलो दराने मिळतायेत. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.
Retail inflation breaches RBI`s comfort zone, jumps to 15-month high of 7.44% in Julyhttps://t.co/uyI3CyqDHq#Economy #Inflation #ConsumerPriceIndex #CPI #ReserveBankofIndia #Investmentguruindia pic.twitter.com/g3hdfHLqdz
— Investment Guru India (@InvGurInd) August 16, 2023
टोमॅटोने हैराण असलेल्या सामान्यांना आता कांद्याची भाववाढ देखील सहन करावी लागते आहे. येत्या ऑक्टोबर पर्यंत खरीपाचे पिक निघेल आणि त्यानंतर कांदे स्वस्त होतील अशी आशा आहे. मात्र सध्या ग्राहकांना टोमॅटो, कांदे आणि हिरव्या पालेभाज्या खरेदी करताना आर्थिक भार सहन करावा लागतो आहे. या सर्व कारणांमुळे देशातील किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
वित्त मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
देशातील किरकोळ महागाईच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ रोखणे गरजेचे असून त्यासाठी RBI आणि वित्त मंत्रालयाने उपापयोजना कराव्यात अशा सूचना वित्त विभागाच्या सल्लागार समितीने दिल्या आहेत. महागाईचा सर्वाधिक फटका हा आर्थिकदृष्या कमकुवत असलेल्या नागरिकांना बसतो, त्यामुळे त्यांचे जीवनमान बिघडू शकते असे समितीने म्हटले आहे.
जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकात (Customer Price Index) वर्षभरातील एक तृतीयांश, म्हणजे सुमारे 32 टक्के भाववाढ ही भाज्यांच्या किमतीत झाली असल्याचे म्हटले आहे. यामागे पावसाचे व आवक घटल्याचे मुख्य कारण असले तरीही सरकारने शक्य होईल त्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर वित्त मंत्रालयाने नेपाळवरून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतला होता.