Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Special FD: स्टेट बँकेच्या स्पेशल एफडीमध्ये 15 ऑगस्टपर्यंत करता येणार गुंतवणूक

SBI Amrit Kalash FD Scheme Extended up to 15 August

स्टेट बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2023 मध्ये एक स्पेशल एफडी स्कीम आणली होती. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेने जून 2023 पर्यंत मुदत दिली होती. पण बँकेने पुन्हा एकदा या योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एप्रिल 2023 मध्ये एक स्पेशल एफडी स्कीम आणली होती. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँकेने जून 2023 पर्यंत मुदत दिली होती. पण बँकेने पुन्हा एकदा या योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

एसबीआय बँक या योजनेंतर्गत किमान 400 दिवसांच्या गुंतवणुकीवर सर्वसाधाररण ग्राहकांना 7.1 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना तेवढ्याच कालावधीसाठी 7.6 टक्के व्याजदर देत आहे.  त्याचबरोबर स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या योजनेवर 1 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.

बँकेने 12 एप्रिल, 2023 मध्ये ही योजना जाहीर केली होती. ही विशेष योजना 400 दिवसांची असून, गुंतवणूकदार याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीसुद्धा पैसे काढू शकतात. एसबीआयच्या या विशेष मुदत ठेवी योजनेचे नाव आहे, अमृत कलश मुदती ठेवी योजना (Amrit Kalash Fixed Deposit Scheme).

स्टेट बँकेने अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणुकीचा कालावधी पुन्हा एकदा वाढवला आहेत. ही योजना गुंतवणूकदारांसाठी 23 जूनपर्यंत खुली होती. पण आता बँकेने याला मुदतवाढ दिली असून ती 15 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुली असणार आहे. या योजनेसाठी कोण पात् आहे, त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा. तसेच यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, याची माहिती आपण घेऊया.

योजनेचा कालावधी किती?

अमृत कलश योजनेचा कालावधी 400 दिवसांचा आहे. गुंतवणूकदार 15 ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना  7.1 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1% अधिक व्याज मिळत आहे. योजनेची मुदत संपण्यापूर्वी गुंतवणूकदार पैसे काढू शकतात. पण मुदतीपूर्वी पैसे काढल्यास त्यावर दंड आकारला जाणार आहे.

अमृत कलश मुदत ठेवीसाठी पात्रता काय?

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • 18 वर्षांवरील व्यक्ती SBI Amrit Kalash योजनेसाठी खाते सुरू करू शकतो.
  • सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी


SBI Amrit Kalash योजनेचे खाते जवळच्या बँकेत अर्ज भरून सुरू करता येते. अर्जासोबत वर दिलेली कागदपत्रे जोडून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. खाते सुरू करण्यासाठी सुरुवातील काही रक्कम जमा करावी लागते.