CIDCO Housing Project: नवी मुंबईला एकविसाव्या शतकातील शहर म्हणून असा नावलौकिक मिळवून देणाऱ्यात सिडकोचा मोलाचा वाटा आहे. गेल्या दोन दशकात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. मुंबई मेट्रो रिजनमध्ये नवी मुंबई हॉटस्पॉट म्हणून विकसित होत आहे. ही जगातील सर्वांत मोठी टाऊनशिप मानली जाते. जी 344 स्केवअर किलोमीटरवर पसरलेली आहे. हीच सिडको पुन्हा एकदा मेगा प्रोजेक्ट घेऊन आली आहे.
सिडकोने आपली ताकद सिद्ध करत पुन्हा एक नवीन मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट घेऊन आली आहे. यामध्ये नागरिकांना नवी मुंबईतील विविध ठिकाणी रास्त किमतीत नवीन घरे विकत घेता येणार आहेत. यातील काही जण प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहेत. सिडकोने आणलेल्या मेगा प्रोजेक्टमध्ये वाशी (वाशी ट्रक टर्मिनस), जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ, खारघर, (रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि बस टर्मिनसजवळ), तळोजा (सेक्टर 28, 29, 31, 37 आणि 39), कामोठे, कळंबोली आणि पनवेलमध्ये भरपूर म्हणजे जवळपास 36 हजार घरे उपलब्ध होणार आहेत.
मेगा प्रोजेक्टमध्ये उपलब्ध असलेल्या घरांमध्ये 29.91 स्क्वेअर मीटर 1 बीएचके, 36.97 स्क्वेअर मीटरमध्ये 1 बीएचके आणि 50 स्क्वेअर मीटरमध्ये 2 बीएचकेची रचना असणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांना याचा 2.5 लाखापर्यंत लाभ घेता येणार आहे. हा लाभ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिला जाणार आहे. यासाठी कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घेता येईल. तसेच त्यांच्या किंवा पत्नीच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर असता नये. अर्जदार हा 15 वर्षांपासून महाराष्ट्रात राहणार असावा.
जे नियमित योजनेतून या मेगा प्रोजेक्टमधील घरांसाठी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या नावावर नवी मुंबईत पक्के घर नसावे. तसेच ते 15 वर्षांपासून महाराष्ट्रात राहणार असावेत. यासाठी सिडकोने आधारकार्ड, पॅनकार्ड, कॅन्सल चेक, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट अशी कागदपत्रांची यादी दिली आहे. त्याचबरोबर जे लोक वेगवेगळ्या कॅटेगरीतून अर्ज भरणार आहेत. त्यांना ती अट पूर्ण करणारी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. सिडकोच्या या मेगा प्रोजेक्टला एसबीआय, एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा, पीएनबी हाऊसिंग या बँकांचे सहकार्य लाभले आहे.