Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

BS6 Norms: BS6 चा दुसरा टप्पा आजपासून लागू; टू-व्हीलर, कार किती महाग होतील?

वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली दिवसेंदिवस कठोर करण्यात येत आहे. BS म्हणजेच भारत स्टेज नियमावली सर्वप्रथम 2020 पासून लागू झाल्यानंतर वाहनांच्या किंमतीही वाढू लागल्या आहेत. आता BS6 नियमावलीचा दुसरा टप्पा आजपासून लागू झाला आहे. (BS6 phase 2 emission Norms) याचा परिणाम वाहन निर्मिती कंपन्यांवर जसा होईल तसाच तो सर्वसामान्य ग्राहकांवर देखील होईल.

Read More

Ather Electric scooter Sales: अथर कंपनीने एकाच महिन्यात विकल्या 1,754 इलेक्ट्रिक स्कुटर्स

Electric scooter : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहे. एथर (Ather) या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. एथर एनर्जीने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली.

Read More

Car Sale India: किया, मारुती सुझुकीच्या वाहनांची विक्री घटली; ह्युंदाई, टोयोटाला ग्राहकांची पसंती

संपूर्ण देशामध्ये वाहन विक्रीमध्ये मागील काही महिन्यांपासून तेजी आहे. दर महिन्याला कोणत्या कंपनीने किती गाड्यांची विक्री केली याची आकडेवारी जाहीर होत असते. मार्च महिन्यातील आकडेवारी समोर आली असून किया आणि मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री घटली आहे. तर ह्युंदाई आणि टोयोटा कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांनी पसंती दिली आहे.

Read More

Maruti Suzuki : मारुती सुझुकीचा धमाका! 25 वर्षांत 2.5 दशलक्ष कार निर्यात

Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.

Read More

Ola electric scooter : देशभरात एकाच दिवशी 50 शोरुम्सचा शुभारंभ

Ola Electric scooter कंपनीने देशभरात एकाच दिवशी तब्बल 50 Experience Centers सुरू करुन इलेक्ट्रिक स्कुटरच्या बाजारामध्ये चांगलीच हलचल निर्माण केली. ओलाच्या या सर्व शोरुमचे उद्घाटन हे ग्राहकांकडून केले असून आणखिन शोरूम्ससुद्धा लवकरच सुरू करणार असल्याची माहिती CEO भावीश अग्रवाल यांनी Twitter च्या माध्यमातून दिली.

Read More

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली, देशभरात उभारली जाणार स्टेशन्स

EV Charging Station : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनसंबंधी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय. तेल विपणन कंपन्यांना हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read More

Hero Moto Price Rise: एप्रिलपासून हिरो मोटो कॉर्पच्या बाईक्स महागणार, कंपनीने केली दरवाढ

Hero Moto Price Rise: वाढत्या महागाईने वाहन उत्पादकांना दरवाढ करावी लागली आहे. दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमतीत 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Brezza CNG Price: पाडव्याला घरी आणा नवीकोरी Brezza CNG; अॅव्हरेज ऐकून म्हणाल हीच गाडी पाहिजे

मारुती सुझुकीने पहिल्यांदाच ब्रेझा गाडीचे सीएनजी व्हेरियंट (Brezza CNG) बाजारात आणले आहे. मागील अनेक दिवासांपासून या गाडीची चर्चा सुरू होती. ही गाडी चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून बुकिंगही सुरू झाले आहे. 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये ब्रेझा CNG गाडी ग्राहकांना चांगला पर्याय आहे. अॅव्हरेज आणि किंमतही परवडणारी आहे.

Read More

BS6-II प्रदूषण नियमावली लवकरच लागू होणार, वाहन कंपन्या आणि ग्राहकांवर काय परिणाम होतील?

BS6-II: प्रदूषण नियंत्रणासाठी एप्रिलपासून BS6-II नियमावली लागू होणार आहे. या नियमांमुळे वाहनांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. रिअल टाइम प्रदूषण मोजण्यासाठी नवीन डिव्हाइसेस गाड्यांमध्ये बसवण्यात येतील. त्यामुळे वाहन निर्मिती खर्चातही वाढ होईल. प्रवासी वाहने, दुचाकी आणि कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढू शकतात.

Read More

EV's Sales In 2022: जगभरात 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रिक कारची विक्री, बॅटरीवरील कारला प्रचंड मागणी

EV's Sales In 2022: इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचा ट्रेंड दिसून आला आहे. वर्ष 2022 मध्ये जगभरात 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रि्क कार्सची विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरच्या चौथ्या तिमाहीत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 53% वाढ झाल्याचे दिसून आले. टेस्ला कंपनीची वाय या ईव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.

Read More

Hyundai Alcazar: 7 सीटर एसयूव्ही झाली लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये पहा

दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई (Hyundai) ने भारतीय बाजारात नवीन अल्काजार (Alcazar) लाँच केली आहे. कंपनीने 7 आणि 6 सीटर पर्यायांसह नवीन एसयूव्ही 16.74 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत सादर केली आहे.

Read More

Matter Aera E-Bike Launch: देशातील पहिल्या इलेक्ट्रिक गिअरबॉक्स बाईकची बुकिंग सुरु, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Matter Aera E-Bike Launched: देशातील पहिली इलेक्ट्रिक गिअरबॉक्स बाईक 'Matter Aera e-bike' हिची बुकिंग सुरु झाली आहे. जर तुम्हाला देखील ही बाईक खरेदी करण्याची इच्छा असेल, तर हिचे फीचर्स आणि किंमत जाणून घ्या.

Read More