Car Sale India: संपूर्ण देशामध्ये वाहन विक्रीमध्ये मागील काही महिन्यांपासून तेजी आहे. दर महिन्याला कोणत्या कंपनीने किती गाड्यांची विक्री केली याची आकडेवारी जाहीर होत असते. (Maruti Suzuki Car sale India) मार्च महिन्यातील आकडेवारी समोर आली असून किया आणि मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री घटली आहे. तर ह्युंदाई आणि टोयोटा कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. सोबतच एमजी मोटर्स च्या गाड्यांची विक्रीही वाढली आहे.
मारुती सुझुकी आणि कियाची विक्री घटली
मागील वर्षी म्हणजेच 2022 च्या मार्च महिन्यात मारुती सुझुकीने जेवढ्या गाड्यांची विक्री झाली होती त्यापेक्षा कमी विक्री चालू वर्षात मार्चमध्ये केली. डिलर्सकडून विक्री होणाऱ्या गाड्यांच्या प्रमाणात 3% घट झाली आहे. (Top selling car in India) दरम्यान, सुझीकीच्या गाड्यांची निर्यात वाढली आहे. पण, देशांतर्गत विक्रीची आकडेवारी निराशा करणारी ठरली. एकंदर आकडेवारीचा विचार करता नुकतेच्या संपलेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीने 2021-22 च्या तुलनेत विक्रीमध्ये वाढ नोंदवली आहे.
किया कंपनीच्या गाड्यांची क्रेझ भारतीयांमध्ये वाढत आहे. मात्र, मार्च महिन्यात एकूण विक्रीत 5% घट आली आहे. मार्च 2023 मध्ये कंपनीने 21,500 गाड्यांची विक्री केली. त्या तुलनेत मागील वर्षी 22,622 गाड्यांची विक्री केली होती. मात्र, तरीही कंपनीला भविष्यात चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम डिझाइन ग्राहकांना देण्यावर किया कंपनीचा भर आहे.
टोयोटा, एमजी कारची मागणी वाढली (Toyota car Sale India)
दरम्यान, टोयोटा किर्लोस्कर आणि एमजी मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. ह्युंदाई कंपनीने मागील वर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत यावर्षी 11% वाढ नोंदवली आहे. मार्च 2022 मध्ये 55,287 कारची विक्री केली होती. त्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये 61 हजारांपेक्षा जास्त गाड्या ह्युंदाईने विकल्या आहेत. तर टोयोटा किर्लोस्करने 9% वाढ नोंदवली आहे. मार्च महिन्यात टोयोटाने 17 हजार 131 कार्सची विक्री केली. तर 2022 मार्चमध्ये 17,131 गाड्यांची विक्री झाली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात टोयोटाने 41% वाढ नोंदवली आहे.
MG मोटर्स इंडियाने मागील वर्षीच्या तुलनेत कार विक्रीत 28% वाढ नोंदवली आहे. मार्च महिन्यात कंपनीने 6 हजारांपेक्षा जास्त कारची विक्री केली. तर मार्च 2022 मध्ये सुमारे साडेचार हजार कारची विक्री झाली होती. (MG comet car launch) एमजी मोटर्स लवकरच भारतीय बाजारात comet ही इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कारकडून कंपनीला मोठ्या आशा लागल्या आहेत.