Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ather Electric scooter Sales: अथर कंपनीने एकाच महिन्यात विकल्या 1,754 इलेक्ट्रिक स्कुटर्स

Ather Electric scooter Sales

Image Source : www.aadiwaadi.com

Electric scooter : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहे. एथर (Ather) या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. एथर एनर्जीने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली.

E- Scooters:  Ather इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांची पसंती लक्षात घेता वर्षाच्या सुरुवातीला चार नवीन रंगाच्या स्कुटर्स मार्केटमध्ये आणल्या. Ather ने 450X ही Google नकाशे असलेली जगातील पहिली स्कूटर आहे. एथर आता वेक्टर नकाशे ऑफर करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यासंबंधित सर्व सोई सुविधा मिळेल. एथर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध असलेला गुगल मॅप आणखी अपडेट करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना ग्राहक आता थेट रहदारी नेव्हिगेशनचा देखील आनंद घेऊ शकतात. तसेच,मोबाईल करीता टक स्क्रीन बदलण्यात आली आहे. एथर इलेक्ट्रिक स्कूटरची सीट आणखी चांगली आणि मजबूत करण्यात आली आहे.

नवीन  एथर स्कूटर जुन्या एथरपेक्षा अधिक प्रगत आहे

पूर्वीच्या मॉडेलमध्ये 4 मोड ऑफर केले गेले होते, तर नवीन पिढी Ather 450 आता एकूण पाच राइडिंग मोड ऑफर करते, ज्यात वार्प, स्पोर्ट, राइड, इको आणि स्मार्ट इको राइडिंग मोड समाविष्ट आहेत. त्याचा टॉप स्पीड इको मोडवर 50-55 च्या दरम्यान येतो. त्याच वेळी, त्याच्या वार्प मोडमधील कमाल पॉवर आउटपुट सध्याच्या 6 kW (8.1 hp) वरून 6.4 kW (8.7 hp) पर्यंत वाढले आहे. यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडा जास्त झाला आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना आर्थिक नफा होतो.

का वाढत आहे ग्राहकांची मागणी

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे देशभरात महागाई वाढली आहे, त्यामुळे आता लोकांनी मोटारसायकलची खरेदी कमी केली आहे. त्याऐवजी लोक बॅटरीसह ई-बाईक स्कूटर खरेदी करत आहेत. या ई-बाईकची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. महत्वाचे म्हणजे या ही वाहने केवळ शहरातच विकली जातात असे नाही. तर ग्रामीण भागात देखील या गाड्यांना प्रचंड मागणी आहे.

बॅटऱ्या असलेल्या दुचाकी स्कूटर्सची दररोज विक्री होत असल्याचे दुकानदार सांगतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात वेगाने वाढ होताना दिसत आहे. किंमत, मायलेज आणि वॉरंटी विचारून लोकांचा आता बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटर्सची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. स्कूटीची किंमत मोटरसायकलपेक्षा कमी आहे.

पट्रोलच्या तुलनेत वीज पडते स्वस्त

एका मोटारसायकलच्या पेट्रोलचा रोजचा खर्च 100 ते 200 आहे, तर ई- स्कूटीचा खर्च फक्त एका चार्जसाठी एक युनिट वीज आहे, जो खूप स्वस्त आहे. सद्यस्थितीत एका कुटूंबात प्रत्येकाकडे स्कुटर आहे किंवा बाईक आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी होणारा पेट्रोलचा खर्च परवडणारा नसतो. म्हणुन आज युवा पिढी सह वयस्कर लोकं सुध्दा  ई-बाईक्स आणि स्कुटरला पसंती देत आहे.  शिवाय प्रदुषण विरहीत असल्याने पर्यावरणाची हानी होत नाही.