Marathi Celebrities Cars: बॉलीवुड तुलनेत मराठी इंडस्ट्रीला नेहमीच वेगळया नजरेने पाहिले गेले आहे. त्यात मराठी चित्रपटातील कलाकार म्हणजे ओके, ठीक असा सर्वांचा एक समज झाला होता. मात्र आता हा समज एक पूर्ण गैरसमज असल्याचे मराठी चित्रपटातील कलाकारांनी दाखवून दिले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi). या अभिनेत्याकडे एक कोटीपेक्षा ही अधिक किंमतीची गाडी आहे. या गाडीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याच्या या ड्रीम कारबद्दल जाणून घेवुयात.
गाडीचे नाव व किंमत (Car Name & Price)
स्वप्नील जोशीने साधारण एक वर्षापूर्वी ‘जॅग्वार I-Pace’ (Jaguar i-Pace) लक्झरी ही कार खरेदी केली होती. ज्यावेळी इलेक्ट्रिक गाडयांची क्रेझ नव्हती, त्यावेळी या अभिनेत्याने ही SUV ची इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याची ही गाडी भारतात लॉंन्च झाली नव्हती. त्यानी ती परदेशातून मागविली होती. मुंबईनगरीत ही गाडी मिळविण्याचा पहिला मान या मराठी कलाकराच्या नावावर आहे. या गाडीची किंमत सुमारे 1.12 कोटी रूपये इतकी आहे. एवढी महागडी गाडी मराठी कलाकाराने घेतल्यामुळे चर्चा तर होणारच. विशेष म्हणजे या गाडीला एक वर्ष होऊन देखील स्वप्नील जोशीच्या गाडीची चर्चा सुरूच आहे. तसेच सध्या या अभिनेत्याच्या ‘वाळवी’ (Valavi) चित्रपटाची चर्चादेखील तुफान सुरू आहे.
गाडीचे घेण्याचे श्रेय बाबांना (Credit to Dad for taking the Car)
स्वप्नील जोशी एका मुलाखतीत म्हणाला की, मी ही महागडी गाडी घेण्याचे सर्व श्रेय बाबांनो देतो. कारण ही इतकी महागडी गाडी घेण्याचे माझे काही नियोजन नव्हते. खरं तर मी शो रूम मध्ये दुसरी गाडी घेण्यासाठी पोहोचलो होतो. पण माझ्या बाबांना तिथे ही गाडी दिसली. ते म्हणाली, स्वप्नील तू ही गाडी का घेत नाही? मग मी त्यांना सांगितले, बाबा ही खूप महाग गाडी आहे. ही बाहेर देशातून मागवून घ्यावी लागते. यासाठी ही खूप चार्जेस लागतात. त्यावर ते म्हणाले, आता इतका खर्च करतच आहे, तर मग या गाडीवरच करना.. तो मेहनत करतोयं ना.. अशी गाडी घे की, जी आतापर्यंत कोणाकडे ही नाही. म्हणून मी ही गाडी घेण्याचे धाडस केले. त्यावेळी जर बाबांनी मला पुश केले नसते, तर आज ही गाडी माझ्याकडे दिसली नसती. पण केवळ बाबा, माझा प्रेक्षकवर्ग व कुटुंबाच्या प्रेमामुळे आज ही आलिशान गाडी माझ्याकडे आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत महागडया गाडयांची क्रेझ (Marathi Celebrities Cars)
मराठी इंडस्ट्रीमध्ये पूर्वी सर्वात महागडी गाडी ही अभिनेता भरत जाधव यांच्याकडे होती. आता एकापाठोपाठ मराठी इंडस्ट्रीमध्ये महागडया गाडया घेण्याची लाइन लागली आहे. सध्या स्वप्नील जोशीसह अमेय वाघ, लिना भागवत, मानसी नाईक, अजय-अतूल, सोनाली कुलकर्णी, महेश मांजरेकर, भरत गणेणपुरे, कुशल बद्रिके, वैभव मांगले या कलाकारांकडेदेखील स्कोडा, फोनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज् सारख्या महागडया गाडया आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            