• 27 Mar, 2023 06:38

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Brezza CNG Price: पाडव्याला घरी आणा नवीकोरी Brezza CNG; अॅव्हरेज ऐकून म्हणाल हीच गाडी पाहिजे

Brezza CNG Price

Image Source : www.carwale.com

मारुती सुझुकीने पहिल्यांदाच ब्रेझा गाडीचे सीएनजी व्हेरियंट (Brezza CNG) बाजारात आणले आहे. मागील अनेक दिवासांपासून या गाडीची चर्चा सुरू होती. ही गाडी चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून बुकिंगही सुरू झाले आहे. 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये ब्रेझा CNG गाडी ग्राहकांना चांगला पर्याय आहे. अॅव्हरेज आणि किंमतही परवडणारी आहे.

Brezza CNG Price: मारुती सुझुकी ब्रेझाचे CNG मॉडेल बाजारात दाखल झाले आहे. मागील काही महिन्यांपासून CNG गाडीची प्रतिक्षा ग्राहकांना होती. अखेर ही गाडी लाँच झाली आहे. कॉम्पॅक्ट एसयुव्ही प्रकारातील ही गाडी असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इंधनाचे दर वाढत असताना सीएनजी गाडी खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. नवीन ब्रेझा सीएनजीचे अॅव्हरेज ऐकून म्हणाल हीच गाडी घ्यायची.  

मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी किंमत (Brezza CNG Price)

मारुती सुझुकी ब्रेझाची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 9.14 ते 12.5 लाखांच्या दरम्यान आहे. Brezza S-CNG गाडीला 5 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन स्पीड गिअर आहेत. सीएनजी इंधनावर गाडी 25.51 किलोमीटर प्रतिकिलो इतके अॅव्हरेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ब्रेझा CNG चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू झाले आहे.

marata-sajhaka-brajha-saenaja-kamata.jpg

4 मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये ब्रेझा ही एकमेव गाडी आहे जी सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ब्रेझा गाडीला 1.5 लिटर क्षमतेचे K15 सिरिजचे इंजिन आहे. या फोर सिलिंडर इंजिनमधून 136 Nm टॉर्क जनरेट होतो. तर CNG इंधनावर धावताना 121 nm टॉर्क पॉवर जनरेट होते. ब्रेझा CNG मुळे मारुती सुझुकीची बाजारातील विक्री आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेझा सीएनजी मॉडेल ऑटो मार्केटमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास कंपनीच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे. मारुती सुझुकीच्या एकूण विक्री झालेल्या गाड्यांपैकी 24% गाड्या S-CNG प्रकारातील आहेत. एर्टिगा आणि वॅगनार या गाड्यांची सीएनजी मॉडेलही मोठ्या प्रमाणात विक्री होतात.

केंद्र सरकारकडून देशभरात CNG पंपांचे जाळे उभारण्यात येत आहे. सध्या देशभरात CNG पंपाची संख्या कमी आहे. त्यामुळे CNG भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगाही पाहायला मिळतात. मात्र, येत्या काळात हे चित्र बदलेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीतही तेच आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत आहे. मात्र, अद्यापही चार्जिंग स्टेशनचे जाळे देशात पसरले नाही. त्यामुळे ग्राहक अजूनही EV कार घेताना विचारात पडतात. तसेच EV गाड्यांच्या किंमतीही जास्त असल्याने पेट्रोल/डिझेलला पर्याय म्हणून CNG गाड्यांना पसंती मिळत आहे.