Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Expensive Cars: जगातील टॉप 10 सर्वात महागड्या कार, किमती बघून व्हाल आश्चर्यचकित!

Most Expensive Cars

Image Source : www.themeparkvillage.com

Most Expensive Cars: जगभरात कारची आवड असणाऱ्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. प्रत्येक व्यक्तीचे मनपसंद कार खरेदी करण्याचे स्वप्नं असतं. हीच माझ्या स्वप्नातील कार असे म्हणत अनेक जण आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी जीवाचे रान करत असतो. मनपसंद कार खरेदी करण्यासाठी कारप्रेमी कोट्यवधी रुपये मोजायलाही तयार असतात.

Most Expensive Cars: जगातील सर्वात महागड्या कारची किंमत किती असू शकते याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? ऑडीपासून ते बीएमडब्ल्यूपर्यंत, आशा बर्‍याच कार आहे ज्यांची किंमत सामान्य माणसाच्या विचारांपलीकडे आहे. तुम्ही फक्त 2 कोटी किंवा 20 कोटींच्या कारचा विचार करू शकाल, पण आज आम्ही तुम्हाला अशा 10 कारबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत तुमच्या विचारापेक्षा फारच जास्त आहे.

रोल्स रॉयसची बोट टेल (Rolls-Royce Boat Tail)         Rools- Royce Boat Tail (1)

जगातील सर्वात महागड्या कारमध्ये रोल्स रॉयस बोट टेल हे नाव प्रथम क्रमांकावर येते. या कारची किंमत तब्बल 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2022 कोटी रुपये इतकी आहे. रोल्स रॉयसची बोट टेल कारची विशेषता म्हणजे ही कार इतकी शांत आहे की जर तुम्ही या गाडीच्या आत बसला असाल तर तुम्हाला घड्याळाची टिकटिक देखील ऐकू येऊ शकते.

बुगाटी ला बुगाटी ला वोइतूर नोइरे (Bugatti La Voiture Noire)

Bugatti La Voiture Noire (1)

Geneva Motor Show 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेली ही कार त्यावेळेची सर्वात महागड्या कार पैकी एक होती. व आजही ही कार जगातील 2 नंबरची सर्वात महागडी गाडी मानली जाते. या कारची किंमत तब्बल 19 मिलियन डॉलर म्हणजेच 133 कोटी इतकी आहे.

रॉल्स रॉयस स्वेप्टटेल (Rolls-Royce Sweptail) 

  Rolls- Royce Sweptail (1)

2017 मध्ये लॉन्च झालेली ही कार किंमती नुसार तिसर्‍या क्रमांकाची सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत 1020 मिलियन म्हणजेच 102 कोटी रुपयांपेक्षा ही जास्त आहे. या कारमध्ये 6.75 एल वी12  हे इंजिन वापरण्यात आले आहे.

बुगाटी सेंटोडीसी (Bugatti Centodieci)

Bugatti Centodieci (1)

जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीत बुगाटीचा दबदबा पाहायला मिळतो. बुगाटी सेंटोडिस ही जगातील चौथी सर्वात महागडी कार ठरली आहे; आणि तिची किंमत सुमारे 72 कोटी रुपये आहे.    

मर्सिडीज मेबॅक एक्सलेरो (Mercedes Maybach Exelero)

Mercedes Maybach exelero (1)

मर्सिडीज कंपनीच्या मेबॅक सिरीजमधील सर्वात महागडी कार "मर्सिडीज मेबॅक एक्सलेरो" ही आहे. या कारची किंमत 630 मिलियन म्हणजेच 63 कोटींहून अधिक आहे.              

स्पायरोज पैनोपोलस चाओस (SP Automotive Chaos)

SP Automotive Chaos (1)

जगातील सर्वात महागड्या कारच्या यादीमध्ये SP Automotive Chaos ही कार सहाव्या स्थानावर आहे; या कारची किंमत सुमारे 51 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बुगाटी शिरॉन सुपर स्पोर्ट 300 प्लस (Bugatti Chiron Super Sport 300+)

Bugatti Chiron super sport (1)

बुगाटी कंपनीची सुपरकार Bugatti Chiron Super Sport 300 Plus ची किंमत 31 कोटींहून अधिक आहे. या कारचा टॉप स्पीड 300 Mph पेक्षा जास्त आहे. 

पैगानी हुआयरा रोडस्टर बीसी (Pagani Huayra Roadster BC)

pagani humayra roadster bc (1)

Pagani Huayra Roadster BC या कारचे जगात फक्त 40 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध होते. या सुपरकारची किंमत सुमारे 28 कोटी रुपये इतकी आहे.  

लैम्बोर्गिनी वेनेनो (Lamborghini Veneno)

Lamborghini veneno (1)

लैम्बोर्गिनी कंपनीची सुपरकार लैम्बोर्गिनी वेनेनोची किंमत जवळपास 36 कोटी रुपये आहे. ही कार केवळ 2.9 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते.          

लायकन हायपर स्पोर्ट (Lykan Hypersport)

lykan hypersport (1)

दुबईस्थित कार कंपनी W मोटर्सच्या "लायकान हायपरस्पोर्ट" ची किंमत 27 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही कार 2013 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.