Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SUV, Hatchback, Sedan, MPV या गाड्यांच्या प्रकाराचा अर्थ काय, तुम्हाला माहितीये का?

Types of Cars

Image Source : www.cardekho.com

सध्याच्या घडीला भारतात कितीतरी कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स उपलब्ध आहेत. यामध्ये एसयूव्ही, हॅचबॅंक, सेदान, काऊप, टीयूव्ही असे प्रकार आहेत; जे बऱ्याच जणांना माहित देखील नाहीत. तर आज आपण गाडीच्या अशाच वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

सध्याच्या घडीला भारतात कितीतरी कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्स उपलब्ध आहेत. यामध्ये एसयूव्ही, हॅचबॅंक, सेदान, काऊप, टीयूव्ही असे प्रकार आहेत; जे बऱ्याच जणांना माहित देखील नाहीत. काही लोकांना गाडीचा फक्त बसण्यासाठी उपयोग एवढेच माहित असते. तर काही लोकांना गाडीच्या मॉडेलपासून त्याच्या इंजिनची कॅपॅसिटी, अंतर्गत सजावट अशी इत्यंभूत माहिती असते. तर आज आपण गाडीच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गाड्यांची नावे ही इंग्रजी आहेत. तसे आपण इंग्रजांकडून अनेक शब्द उधारीवर घेतले आहेत. जसे की, आपल्याकडे मराठी व्यवहारात वापरला जाणारा ऑटो, कार, बाईक, मोटरसायकल हे शब्द इंग्रजी आहेत. पण ते आपण आता सर्रास वापरतो. असो तर आज आपण अशाच गाड्यांच्या प्रकारांना दिलेल्या इंग्रजी नावांबद्दल जाणून घेणार आहोत.

हॅचबॅक (Hatchback)

Hatchback
Image Source: www.carfax.com

हॅचबॅक हा गाड्यांमधील असा एक प्रकार आहे. जो भारतात खूप लोकप्रिय आहे. हॅचबॅच प्रकारामध्ये छोट्या गाड्यांचा समावेश होतो. या गाड्या आकाराने लहान असतात.चार जणांच्या लहान कुटुंबासाठी अशा गाड्या प्रसिद्ध आहेत. हॅचबॅक प्रकारच्या गाड्यांमध्ये मागे गाडीला बुटासारखा आकार नसतो. त्या मागच्या बाजुला सपाट असतात. या प्रकारात भारतातील Maruti Suzuki Alto 800, Maruti Suzuki Alto K10, Renault Kwid आणि Dastun redi-Go  अशाप्रकारच्या गाड्यांचा समावेश होतो.

सेदान (Sedan) 

Sedan
Image Source:  www.cardekho.com

सेदान प्रकारामध्ये येणाऱ्या गाड्या या जरा लांबलचक असतात. या गाड्यांना साधारणपणे भारतात फॅमिली कार म्हटले जाते. या गाड्यांमध्ये इतर गाड्यांच्या तुलनेत काही गोष्टी अधिकच्या दिलेल्या असतात. भारतात Honda Amaze, Maruthi Suzuki Dzire, Hyundai Xcent, Tata Tiago, Volkswagen Ameo या सेदान प्रकारात मोडणाऱ्या गाड्या आहेत.

एसयूव्ही (SUV - Sports Utility Vehicle)

SUV
Image Source:  www.auto.hindustantimes.com

एसयूव्ही याचा फुलफॉर्म आहे; स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल. या गाड्यांची खासियत म्हणजे या गाड्या कोणत्याही रस्त्यावर व्यवस्थित चालतात. एसयूव्ही प्रकारातील काही गाड्यांमध्ये Maruti Suzuki Gypsy, Mahindra Thar, Toyota Fortuner, Mahindra Scorpio, Honda CR-V या गाड्यांचा समावेश होतो.

मल्टीपर्पज व्हेईकल (MultiPurpose Vehicle)

MPV Category
Image Source:  www.en.wikipedia.org

एमपीव्ही म्हणजेच मल्टीपर्पज व्हेईकल कार. या गाडीला सिटी कार किंवा फॅमिली कार म्हटले जाते. या गाड्यांची रचना ही जास्तीत जास्त सामान आणि प्रवाशी घेऊन जाण्यासाठी डिझाईन केलेली आहे. या गाड्यांमध्ये 5 आणि 7 सीटचे पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकारामध्ये Maruti Suzuki Ertiga, Mahindra Marazzo, Toyota Innova Crysta या गाड्यांचा समावेश होतो.