Maruti Suzuki Cars: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नुकताच आणखी एक धमाका केला आहे. सन 1986-87 पासून,मारुती सुझुकीने परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली होती. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे. इतकेच नाही तर, आत्तापर्यंत मारुती सुझुकीने भारतातून 25 लाख कार बनवून परदेशात विकल्या आहेत.
Table of contents [Show]
कधी झाली कंपणीची सुरुवात
1986-87 मध्ये मारुती सुझुकीने बांगलादेश आणि नेपाळ सारख्या देशांमध्ये कार विकण्यास सुरुवात केली. सध्या, मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांसह जगातील 100 देशांमध्ये कार निर्यात करत आहे.
मारुती सुझुकी बलेनोचा नवा विक्रम
मारुती सुझुकी बलेनोच्या रूपाने मारुतीने 2.5 दशलक्ष कार निर्यात करण्याचा विक्रम केला आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरातून लॅटिन अमेरिकेला पाठविल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीच्या बलेनोने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताचा वाहन निर्यातीत मोठा वाटा
मारुती सुझुकी इंडियाचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, 'भारतातून 2.5 दशलक्ष मारुती कारची निर्यात ही भारताच्या उत्पादन शक्तीचे प्रतिबिंब आहे. भारताचा वाहन निर्यातीत मोठा वाटा आहे'. मारुती सुझुकीने सप्टेंबर 1987 मध्ये हंगेरीला त्याच्या पहिल्या मोठ्या निर्यातीचा भाग म्हणून 500 कार पाठवल्या. मारुती सुझुकीने 1986 मध्ये कार निर्यात करण्यास सुरुवात केली. यानंतर जगभरात मारुतीच्या कारची पसंती वाढली आणि जागतिक ग्राहकांमध्ये ब्रँड इंडिया आणि ब्रँड मारुतीची चांगली प्रतिमा निर्माण झाली. मारुती सुझुकीच्या सीईओने म्हटले आहे की, 'मारुती या ब्रँडने उत्कृष्ट गुणवत्ता, मजबूत कामगिरी, विश्वासार्हता आणि कमी किमतीमुळे जगात आपले स्थान कमावले आहे'.
मारुती सुझुकीने पटकावले अव्वल स्थान
गेल्या काही वर्षांत मारुती सुझुकीने भारतातून निर्यात होणाऱ्या कारच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावले आहे. मारुती सुझुकीच्या बलेनो, अल्टो आणि ब्रेझा हे भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्समध्ये आहेत.