Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero Moto Price Rise: एप्रिलपासून हिरो मोटो कॉर्पच्या बाईक्स महागणार, कंपनीने केली दरवाढ

Hero motorcorp vehicles price increased

Hero Moto Price Rise: वाढत्या महागाईने वाहन उत्पादकांना दरवाढ करावी लागली आहे. दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमतीत 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्प्लेंडर आणि HF डिलक्स सारख्या सर्वोत्तम मायलेज बाइक्स किंवा Maestro आणि Pleasure सारख्या स्कुटर खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर 31 मार्चपूर्वी खरेदी करा. कारण, Hero MotoCorp ने सर्व बाइक्स आणि स्कुटरच्या किमतींमध्ये 2% वाढ करण्याची घोषणा केली आहे. मॉडेल व श्रेणीनुसार या किमती वाढणार आहेत. ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स-2 (OBD-2) नियमांमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे Splendor आणि HF Deluxe या मोटरसायलक सुमारे 1500 रुपयांनी वाढणार आहेत. यापूर्वी 1 डिसेंबर 2022 रोजी कंपनीने दुचाकींच्या किमती1500 रुपयांनी वाढवल्या होत्या. त्यावेळीही Hero MotoCorp ने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमती स्वतंत्रपणे वाढवल्या होत्या.

वाढत्या उत्पादन खर्चामुळे वाहने महाग (Rising Production Costs)

Hero MotoCorp च्या मते, वाहनांना रिअल-टाइम ड्रायव्हिंग एमिशन (RDE) पातळीचे निरीक्षण करण्यासाठी ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD-2) हे उपकरण प्रत्येक वाहनात बसवण्याची आवश्यकता आहे. या उपकरणाद्वारे रिअल टाईम ड्रायव्हिंग एमिश वाहनांमधून निर्माण होणाऱ्या एमिशनची (वायू उत्सर्जन)  माहिती मिळू शकेल. सरकारने सर्व वाहनांमध्ये हे उपकरण बसवणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

Hero MotoCorp ने सांगितले आहे की ते ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम कमी करण्यासाठी विविध फायनान्स ऑफर ग्राहकांसाठी घेऊन येतील. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, Hero MotoCorp ने घोषणा केली होती की ते भारतातील त्यांच्या उत्पादन युनिट्समधून पुढील 2-3 वर्षांत 10 लाख पेक्षा जास्त वाहने तयार करतील.

प्रिमीयम सेगमेंटमध्ये उतरणार (Hero Will Launch Premium Segment Bikes)

Hero MotoCorp लवकरच प्रिमीयम सेगमेंट इलेक्ट्रिक बाइक आणणार आहे. यासाठी कंपनीने अमेरिकेच्या झिरो मोटरसायकलशी नुकताच करार केला आहे. यूएस मध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि पॉवरट्रेनमध्ये झिरो मोटरसायकल ही आघाडीची कंपनी मानली जाते. सप्टेंबर 2022 मध्ये, Hero MotoCorp च्या बोर्डाने कॅलिफोर्निया-आधारित झिरो मोटरसायकलमध्ये USD 60 दशलक्ष म्हणजेच  सुमारे 585 कोटी रुपयांच्या इक्विटी गुंतवणुकीला मान्यता दिली.

Source: www.dainikbhaskar.com