नवरात्री आणि दसऱ्या निमित्त ह्युंदायने नवीन कार्सवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवीन कार बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सवलत दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ह्युंदायच्या i20 आणि Venue या कार्सवर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. मागील दोन वर्षात या कार्सनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. i20 N Line या कारच्या जुन्या मोटारीवर 50000 रुपयांची सवलत मिळेल. नवीन i20 N Line वर 10000 रुपयांची सवलत मिळेल. या मोटारीची एक्स शोरुम किंमत 9.99 लाख रुपये इतकी आहे.
ह्युंदायने Grand i10 Nios या कारवर देखील सवलत जाहीर केली आहे. हॅचबॅक श्रेणीतील ही कार प्रचंड लोकप्रिय आहे. Grand i10 Nios या कारवर 43000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. Grand i10 Nios ही हायब्रीड श्रेणीत असून या कारमध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन आणि सीएनजी असा इंधनाचा पर्याय आहे.
सेडान श्रेणीतील ऑरा या कारसाठी कंपनीने 33000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला आहे. ह्युंदाय ऑरा ही कार मारुती सुझुकी डिझायर, टाटा टिगोर, होंडा अमेझ या सेडाने श्रेणीतील कारशी स्पर्धा करते.
ह्युंडायने नुकताच व्हर्ना कारला अद्ययावत वैशिष्ट्यांसह सादर केले गोते. ह्युंदाय व्हर्नाची किंमत 10.96 लाख रुपये इतकी आहे. ह्युंडाय व्हर्नावर 25000 रुपयांची फेस्टिव्ह ऑफर देण्यात आली आहे.
ह्युंडायने सप्टेंबर महिन्यात एकूण 71641 कार्सची विक्री केली होती. कंपनीसाठी एकाच महिन्यात भारतात झालेली आजवरची सर्वाधिक विक्री ठरली. या विक्रीत ह्युंडायच्या एक्स्टर, व्हेन्यू आणि क्रेटा या कार्सचा मोठा वाटा ठरला.
कंपनीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात ह्युंडाय इंडियाने स्थानिक बाजारा 54241 कारची विक्री केली. कंपनीने याच महिन्यात 17400 कारची निर्यात केली. स्थानिक विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.13% वाढ झाली. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने 49700 कारची विक्री केली होती. ह्युंडायच्या विक्रीत एसयूव्ही श्रेणीतील कार्सचा मोठा वाटा आहे.
ह्युंडाय एक्स्टर या कारसाठी प्रतीक्षा कालावधी 9 महिन्यांपर्यंत वाढला आहे. तर टॉपलाईन एसएक्स आणि एसएक्स ओ या मोटारींसाठीचा प्रतीक्षा कालावधी चार ते पाच महिने इतका आहे. कंपनीसाठी सप्टेंबर महिना सर्वोत्तम ठरला. ग्राहकांमध्ये ह्युंडाय ब्रॅंडने एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे ह्युंडाय मोटर्सचे सीओओ तरुण गर्ग यांनी सांगितले. ते म्हणाले ह्युंडायसाठी स्थानिक पातळीवरील विक्रीत 75% वाटा हा एसयूव्ही श्रेणीतील वाहनांचा आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            