देशात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे. याच इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन ‘Matter Aera e-bike’ ही देशातील पहिली गिअर इलेक्ट्रिक बाईक म्हणून ओळखली जात आहे. जी गुजरातमधील अहमदाबाद येथील स्टार्टअप मॅटर एनर्जी कंपनीने लाँन्च केली आहे. ही बाईक त्यांनी चार व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ज्यामध्ये पहिले Matter Aera 4000, दुसरे Matter Aera 5000, तिसरे Matter Aera 5000+ आणि चौथे Matter Aera 6000+ यांचा समावेश करण्यात आला आहे. ही बाईक नक्की कशी आहे, यामध्ये कोणते फीचर्स आहेत आणि याची किंमत काय जाणून घेऊयात.
Matter Aera e-bike मध्ये कोणती फीचर्स आहेत?
4 स्पीड गिअरबॉक्ससह Matter Aera 5000 आणि Matter Aera 5000+ च्या राइडिंग रेंजच्या संदर्भात, कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 125 किमी रेंज देते. याशिवाय Matter Aera 6000+ ची रेंज 150 किमी असल्याचे सांगितले आहे.
कंपनीने 5 आणि 6 kWh क्षमता असलेल्या बॅटरी पॅकचा पर्याय दिला आहे. जो लिक्विड कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित असून या बॅटरी पॅकला सामान्य चार्जरने चार्ज केल्यास चार्जिंग 5 तासांत पूर्ण चार्ज होते. तर फास्ट चार्जरने चार्जिंग केली तर, 2 तासात चार्ज पूर्ण होते, असा दावा कंपनीने केला आहे.
याशिवाय कंपनीने 4 जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 7 इंच टचस्क्रीन एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल असे सर्वोत्तम पर्याय यामध्ये दिले आहेत.
Matter Aera e-bike किंमत किती?
कंपनीने या बाईकचे Matter Aera 5000 आणि Matter Aera 5000+व्हेरिएंटसाठी प्री बुकिंग सुरु केले आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बाईक बुक करू शकतील. मार्च मध्ये बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना एप्रिल महिन्यात डिलिव्हरी करण्यात येईल. जे ग्राहक Matter Aera इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणार आहेत त्यांना 3 वर्षांसाठी रोडसाईड असिस्टेंस, 3 वर्षे किंवा अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी देण्यात येईल.
कंपनीने या बाईकची किंमत 1,43,999 रुपयांपासून सुरू केली आहे, तर टाॅप माॅडेलची किंमत 1,53,999 रुपये असणार आहे. ही किंमत प्री रजिस्ट्रेशन आणि FAME ।। अनुदानासोबत देण्यात येत आहे.