Hyundai car discount: ह्युंदाई कंपनीने काही निवडक कार मॉडेल्सवर फेब्रुवारी महिन्यासाठी डिस्काउंट जाहीर केला आहे. तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच ह्युंदाईच्या शोरुमला भेट द्या. Aura, i20, आणि Grand i10 Nios या कार्सवर कंपनीने सूट जाहीर केली आहे. कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट द्वारे कारच्या किंमतीत 33 हजारापर्यंत सूट मिळवू शकता. (Hyundai car offer)
Aura CNG वर सर्वाधिक सूट( Hyundai Aura offer)
गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी बुकिंग ऑर्डर्स लवकर संपवण्यासाठी ही सूट दिली आहे. सर्वात जास्त डिस्काऊंट Aura CNG कारवर देण्यात येत आहे. या कारवर 20 हजारांचा कॅश डिस्काऊंट तर 10 हजार एक्सचेंज बोनस आणि 3 हजारांचा कॉर्पोरेट बोनस असे मिळून 33 हजारांची सूट मिळत आहे. तर Aura च्या इतर व्हेरियंटवर 23 हजार रुपयांचा बोनस मिळत आहे.
ह्युंदाई i20 ऑफर (Hyundai i20 offer)
ह्युंदाई i20 हॅचबॅक कारवर सुद्धा ऑफर सुरू आहे. स्पोर्ट्स आणि मॅनगग या व्हेरियंटमधील गाड्यांवर 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस 10 हजार रुपये मिळत आहे. तर ह्युदांई Grand i10 Nios वर 10 हजार रुपये डिस्काउंट आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
या कार्सवर डिस्काउंट नाही
क्रेटा, व्हेन्यू, वेरना, i20 N-LIne, Tuscon आणि Alcazar या गाड्यांवर फेब्रुवारी महिन्यात कोणताही डिस्काउंट देण्यात येत नाही. मात्र, लोकल डिलरकडून ऑफर देण्यात येऊ शकते. तसेच कंपनीने ज्या गाड्यांवर डिस्काउंट दिला आहे त्याव्यतिरिक्त डिलरने जर काही डिस्काउंट जाहीर केला असेल तर कार आणखी स्वस्तात पडेल.
ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित
ह्युंदाई मोटर्सच्या गाड्या शहरांमध्ये सर्वाधिक विक्री होतात. मात्र, आता कंपनीने ग्रामीण भागावर देखील लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील वर्षभरात कंपनीने ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा जास्त कारची विक्री केली. क्रेटा कारची ग्रामीण भागातील मागणीही वाढत आहे. (Rural car market) ह्युंदाईने वितरक आणि सर्व्हिस सेंटर्सचे जाळे ग्रामीण भागात उभे करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला यश येताना दिसत आहे.
मागील वर्षात एकूण कारविक्रीपैकी ह्युंदाईने 26% डिझेल कार बाजारात विकल्या. SUV गाड्यांची मागणीही वाढत आहे. कोरोनापूर्वी डिझेल गाड्यांची जेवढी विक्री होत होती, त्याच प्रमाणात आताही गाड्यांची विक्री होत आहे, असे ह्युंदाईचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. एकूण विक्री झालेल्या क्रेटा गाड्यांपैकी 54 टक्के गाड्या डिझेल श्रेणीतील आहेत. तर अल्कझार आणि ट्युकसन प्रत्येक 75% आणि 72 टक्के आहेत. एकून विक्री झालेल्या गाड्यांचा विचार करता सुमारे 53 टक्के SUV गाड्यांना मागणी आहे, असे गर्ग म्हणाले.