देशात कितीही Public Transport चा स्तर उंचावला, त्यासाठी कितीही सुविधा (Facilities) उपलब्ध केल्या तरीही स्वत:चं खासगी वाहन (Personal Vehicle)असणे ही आताच्या काळात गरज बनली आहे.पण शंभरीपार उडी मारणाऱ्या पेट्रोलच्या दराचा विचार करता थोड्या दिवसांनी गाडी चालवणे चैनीची बाब होतेय की काय असं वाटू लागलं आहे.पण बाजारात विजेवर चालणाऱ्या (Electric) टू-व्हिलर आणि फोर-व्हिलर आल्यामुळे ही चिंता आता मिटत आहे. त्यामुळेच भारतीय कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिककडून देशभरात 200 हून अधिक शोरुम सुरू होणं ही आनंदाची बातमी ठरत आहे.
Table of contents [Show]
ओला इलेक्ट्रिक स्कुटरचे नवीन 50 शोरुम्स
बाजारामध्ये ओला इलेक्ट्रिकच्या वाढत्या मागणीनंतर ग्राहकांकडून वारंवार आपल्या शहरामध्ये ओला इलेक्ट्रिकचे शोरुम सुरू करण्यासाठी विचारणा होत होती. वाढती मागणी, ग्राहकांची पसंती पाहता फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून विक्री करणाऱ्या ओला कंपनीने अखेर आपले शोरुम्ससुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च 2023 पर्यंत 500 शोरूम्सचे टार्गेटही ठेवले. त्यानुसार ओलाने गेल्या रविवारी म्हणजेच 26 मार्चला देशभरात 50 शोरुम सुरू केली.ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.आगामी काळात आणखीन नवीन शोरुम्स सह सर्व्हिस सेंटर ही सुरू करणार असल्याची माहिती ओला ने दिली आहे.
Fulfilling our commitment of opening stores near you across the country!
— Bhavish Aggarwal (@bhash) March 28, 2023
50 stores opened on Sunday. Launched by our Community Members. In a single day!!
Who wants to inaugurate our next store! pic.twitter.com/vfH5YpQBNF
देशाच्या कोणत्या शहरात सुरू झाले ओलाचे नवीन शोरुम
हे शोरुम केवळ मेट्रो सिटीमध्ये नसुन देशातल्या छोट्या छोट्या शहरात ही शोरुम सुरू करण्यावर ओलाने भर दिला आहे. मुंबईमधल्या भिवंडी, नागपूर, बँगलोरमधल्या केंगेरी,दिल्लीमधल्या बुरारी,तामिळनाडूतील डिंडीगुल,नैनीताल मधल्या हल्द्वानी,धारवाड, होशंगाबाद, जोधपूर, लखनऊ, मधपुर, नागरकोल, विशाखापट्म, वालासोर, नागोल, कलबुर्गी, कानपुर आदी शहरांमध्ये हे शोरुम सुरू करण्यात आले आहेत. या सर्व शोरुमचे उद्घाटनही ओलाच्या ग्राहकांकडुन करण्यात आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत
आतापर्यंत ओला इलेक्ट्रिकने 85 हजार ते दीड लाखांच्या घरातील तीन मॉडेल्स बाजारात आणले आहेत. यापैकी ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो या दोन सिरीजमध्ये वेगवेगळ्या बदलांसह आणखीन पर्यायसुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत.
ओला इलेक्ट्रिकचा खप
ओला इलेक्ट्रिक स्कुटरच्या खपामध्ये दिवसेगणिक वाढ होत असून इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटमध्ये 30 टक्के हिस्सा वाढवल्याचा दावा कंपनीने केला आहे. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 18 हजारहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये एकुण 25 हजार गाड्यांची विक्री केली तर 2022 या संपूर्ण वर्षात कंपनीने दीड लाख गाड्यांची विक्री केल्याचे त्यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कुटरचे मार्केटिंग
मे 2020 साली ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली. सुरूवातीच्या काळात ओला इलेक्ट्रिकच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच गाड्यांची विक्री होत असे. मात्र, कालांतराने कंपनीने 2022 दरम्यान कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी शोरुम सुरू करण्यास सुरूवात केली. आज देशभरात कंपनीच्या स्वत:च्या मालकीचे जवळपास 200 हून अधिक शोरुम्स सुरू असून अन्य शोरूम्सची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, हे सर्व शोरुम्स कंपनीच्या मालकीचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची भागिदारी दिली जात नाही. आज यूट्यूबवर ओला इलेक्ट्रिक स्टुटरसाठी डिलरशीप वा फ्रेंचाईजी कशी मिळवावी या संदर्भातले बरेच व्हिडीओ आढळून येतात. मात्र, ओला इलेक्ट्रीक कंपनीकडुन अशा प्रकारची भागिदारी, डिलरशीप वा फ्रेंचाईजी अजुन तरी दिली जात नसल्याची प्रत्यक्ष सुचना त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरही दिली आहे.
Source - https://bit.ly/3ZCtR3z