• 27 Sep, 2023 01:07

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Biggest Land Deal: बॉम्बे डाईंगच्या वरळीतील प्रॉपर्टीसाठी 5200 कोटी रुपयांचा सौदा

Mumbai Biggest Land Deal

Mumbai Biggest Land Deal: वाडिया ग्रुपमधील बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने वरळीमधील जवळपास 22 एकर जमीन गोइसु रिअल्टीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

वाडिया ग्रुपमधील बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने (BMDC) वरळी येथील 22 एकर जमिनीवर असलेले आपले मुख्यालय जपानच्या गोइसु रिअल्टी कंपनीला 5200 कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. ही डील बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) झाली असून, मुंबईतील जागे संदर्भातील ही सर्वांत मोठी डील असल्याचे म्हटले जाते.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईतल्या जमिनीचे भाव नेहमीच गगनाला भिडलेले असतात. त्यात वरळी हा मुंबईतील प्राईम एरिया मानला जातो. या प्राईम लोकेशनवर बॉम्बे डाईंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे (BMDC)हेडक्वार्टर 22 एकरमध्ये पसरलेले आहे. दरम्यान, ही जागा मिलची असल्याने सरकारच्या धोरणानुसार यातील 8 एकर जमीन कंपनीने मुंबई महानगरपालिका आणि म्हाडाकडे सुपूर्द केली आहे. त्या बदल्यात पालिकेकडून संबंधित जमीन घेणाऱ्या डेव्हलपरला 82 हजार चौरस मीटरचा एफएसआय मिळणार आहे.

बॉम्बे डाईंग आणि गोइसु रिअल्टी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार हा डील दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.  पहिल्या टप्प्यात बॉम्बे डाईंगला गोइसु कंपनीकडून 4,675 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उर्वरित 525 कोटी रुपयांची रक्कम डील पूर्ण झाल्यानंतर दिली जाणार आहे.    

शिल्पा शेट्टीचे हॉटेल होणार बंद

बॉम्बे डाईंग कंपनीच्या याच इमारतीत शिल्पा शेट्टीचे बॅस्टिअन रेस्टॉरन्ट आहे. या डीलमुळे हे रेस्टॉरन्टसुद्धा बंद होणार आहे. मागील आठवड्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इथली महत्त्वाची कागदपत्रे आणि सामान दादरमधील प्रॉपर्टीमध्ये शिफ्ट केली होती. मिलच्या जमीनीच्या धोरणानुसार यातील 8 एकर जमीन महापालिका आणि म्हाडाला दिली जाणार आहे. महापालिका इथे एखादे पार्क उभारू शकते. तर म्हाडा यातील काही जागा हाऊसिंगसाठी डेव्हलप करू शकते.

गोइसु रिअल्टी

गोइसु रिअल्टी ही जपानमधील कंपनी आहे. या कंपनीने 2019 मध्ये बीकेसीमधील 12,141 चौरस मीटर जागा MMRDA कडून लीजवर घेतली होती. यासाठी या कंपनीने 2,238 कोटी रुपये भाडे दिले होते. गोइसु रिअल्टी ही सुमितोमो कॉर्पोरेशनचा एक भाग असून, सुमितोमो अंतर्गत जवळपास 886 कंपन्या आहेत. हा ग्रुप ऑफिस बिल्डिंग डेव्हलपमेंट, निवासी इमारती, लॉजिस्टिक फॅसिलिटी आणि रिअल इस्टेट फंडमध्ये कार्यरत आहे.