Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Indian Festival Sale: ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू

Amazon Indian Festival sale 2023

Image Source : www.aboutamazon.in

Amazon Indian Festival Sale: येत्या 23 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' सुरू होत आहे. यामध्ये विविध ब्रँडेड उत्पादनांवर तब्बल 75 टक्के एवढा भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे.

ॲमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज यावर तब्बल 75 टक्के एवढा जबरदस्त डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, प्रिंटर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, इयर बडस यासारख्या वेगवेगळ्या गॅजेट्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर आहेत. या ऑफरअंतर्गत one plus, samsung, Redme आणि Realme यासारखी प्राईम उत्पादने मोठया डिस्काउंट ऑफरमध्ये मिळणार आहेत.  

5G मोबाईलवर आकर्षक सवलत

Apple iPhone 13 SE, iPhone 14, iPhone 14 pro यांसारखे अद्ययावत 5G मोबाईल आकर्षक सवलत दरांमध्ये मिळतील. Apple iPhone 12 आणि 13 हे जवळपास 60 ते 70 हजारापर्यंतचे ब्रँडेड फोन 56 हजारापर्यंत तर त्याच श्रेणीतील iPhone 14 हे 80,000 पर्यंत मिळणारे मॉडेल 65,000 पर्यंतच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. याचबरोबर Redmi श्रेणीतील विविध फोन 7 ते बारा 12,000 पर्यंतच्या डिस्काउंट किमतीत उपलब्ध आहेत.

ब्रँडेड लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट

Lenevo, HP, Global Solution यांसारख्या लॅपटॉपची खरेदी करून रुपये 35,000 पर्यंतची बचत करण्याची संधी या ठिकाणी आहे. Break reminder, distance reminder, physical web cam security shutter यांसारख्या अद्ययावत सुविधा देणारा Lenovo Idea Pad slim 3,  256 Gb इंटरनल स्टोरेज व 8 Gb RAM असणारा HP Ryzen 3 हा 14 इंचेस लॅपटॉप हे 55 ते 80 हजारापर्यंत उपलब्ध असतील . Lenovo चा 72,000 पर्यंतचा लॅपटॉप 56,000 मध्ये तर शाओमीचा 76,000 पर्यंत मिळणारा लॅपटॉप 56,000 त उपलब्ध असेल  . याचबरोबर Acer, Dell, HP चे लॅपटॉप 35 ते 40,000 पर्यंत डिस्काउंट किमतीत मिळतील.

स्मार्ट टीव्ही 

याचबरोबर MI  32 इंचांचा स्मार्ट टीव्ही 12,499 अशा अविश्वसनीय सवलतीच्या दरात. तर 56, 700 मार्केट रेट असलेला Sansui 55 इंचेस अँड्रॉइड टीव्ही केवळ 32,963 रुपयांच्या आकर्षक डिस्काउंट मध्ये उपलब्ध असेल.

होम अप्लायन्सेस

होम डेकोर आणि किचन अप्लायन्सेस वर 70 ते 80 टक्क्यांपर्यंतचे जबरदस्त डिस्काउंट आहे. यामध्ये आकर्षक रंगसंगती व उत्कृष्ट दर्जाचे बेडशीट व पिलो कव्हर सेट केवळ 209 इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहेत.  Milton कंपनीचा मॉप सेट (विथ बकेट) केवळ 1,399 रुपयात मिळतील. गणेशोत्सवात हमखास ला गणाऱ्या सजावटीच्या लाईट्स , लाईटिंगच्या माळा यांवर 70 टक्क्यांइतकी घसघशीत सूट आहे. Milton चा plastic pet storage jar चा 1,314 रुपयाचा सेट केवळ 379 रुपयात  उपलब्ध असणार  आहे. तर pigeon कंपनीचा 1395  रुपये किमतीचा प्रेशर कुकर केवळ 699 रुपयात मिळतील. एवढेच नव्हे तर स्टेलनेस स्टील हंडी  किचन सेट आणि अप्पे मेकर केवळ 299 रुपयांत मिळणार आहे .

फॅशन रेंजवर ऑफर

इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज बरोबरच लेडीज, जेन्ट्स व लहान मुलांसाठी कपड्यांमधली मोठी फॅशन रेंज या ठिकाणी उपलब्ध असून त्यावर भरघोस डिस्काउंट असणार आहे. लेडीज चे ड्रेसेस 199 रुपयांपासून उपलब्ध होणार असून यात  T -shirt, लेगिन्स , जीन्स ,ट्रकर्स , आदींचा समावेश असून harpa , BIBA, यांसारख्या ब्रँडेड उत्पादनांवर 84 टक्क्यांपर्यंतची सूट आहे. मेन्सवेअर मध्ये देखील Levis, Dennis, Lingo, red tape  अशा ब्रँड्सच्या कपड्यांवर 86 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट असणार आहे. Titan, fast track, या कंपन्यांच्या घड्याळांवर 70टक्क्यांपर्यंतची सूट आहे. xiaomi चे 76,000पर्यंत मिळणारे घड्याळ याठिकाणी 48,000 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

फ्री शिपिंग

सर्व उत्पादनांना फ्री शिपिंग अर्थात मोफत पोहोच (delivery )सेवा असणार आहे.  प्रत्येक उत्पादनावर बारा महिन्यांचा EMI (मासिक हप्ता) पिरेड मिळणार असून सर्व उत्पादनांवर वॉरंटी देखील मिळणार आहे. 

कार्ड धारकांसाठी सेव्हींग ऑफर

HDFC  बँक कार्डधारकांना रुपये  5000 पर्यंतचे अतिरिक्त तर वन क्रेडिट कार्ड धारकांना रुपये 2000 पर्यंतचे सेव्हींग ऑफर करण्यात आले आहे.

ॲमेझॉन कार्ड ऑफर

ॲमेझॉन कार्ड ऑफरमध्ये आपल्या पहिल्या ऑर्डरवर 20% पर्यंतची  मोठी कॅशबॅक मिळवण् सेयाची संधी आहे. ही ऑफर 10 ऑक्टोबर पर्यंत मर्यादित असून या सणासुदीच्या दिवसात आपल्या प्रियजनांसाठी व कुटुंबीयांसाठी मनसोक्त खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.