तुम्ही जर नव्या तंत्रज्ञानावर, इनोव्हेटिव्ह आयडीयावर काम करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरू शकते. याचे कारण म्हन्के अशा विषयांवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना, उद्योजकांना एका स्पर्धेत भाग घेऊन 10 लाकः रुपये जिंकण्याची संधी चालून आंली आहे. ही स्पर्धा नेमकी काय आहे हे जणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा.
एयरक्राफ्ट, डिफेन्स, टेक्नोलॉजी आणि सामाजिक विषयांवर जे विद्यार्थी किंवा युवा उद्योजक काम करत आहेत अशांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी एव्हिएशन कंपनी बोईंग इंडियाने ‘BUILD’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे संपूर्ण नाव आहे, बोईंग युनिव्हर्सिटी इनोव्हेशन लीडरशिप डेव्हलपमेंट (Boeing University Innovation Leadership Development). या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून युवा उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही कंपनी सदर स्पर्धा आयोजित करत आहे.
बाजारपेठ आणि इन्व्हेस्टर मिळण्याची संधी!
या स्पर्धेत विविध क्षेत्रातील युवक-युवती भाग घेऊ शकणार आहेत. येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमची कल्पना, तुमचे मॉडेल आणि त्याची उपयुक्तता याबद्दल सविस्तर माहिती बोईंग युनिव्हर्सिटी इनोव्हेशन लीडरशिप डेव्हलपमेंटच्या अधिकृत पोर्टलवर जुं भरायची आहे. यासाठी कुठलेही शुल्क भरायची गरज नाहीये.
तुमच्या प्रकल्पावर निवड समितीकडून निर्णय घेतला जाईल आणि तुमच्या प्रकल्पाची पाहणी केली जाईल, त्यानंतर निवडक 7 प्रकल्पांना बक्षिसे दिले जातील.
Applications for Boeing University Innovation Leadership Development (BUILD) program 2023-24 are now open!
— Boeing India (@Boeing_In) September 12, 2023
BUILD is looking for startup entrepreneurs and students to incubate innovative ideas and create new market opportunities and global trends in India and the world.
Apply… pic.twitter.com/MUCETYLL1S
या संपूर्ण प्रक्रियेत देशभरातील नामांकित 7 अशा इनक्युबेशन सेंटर्सशी बोईंग इंडियाने करार केला आहे. हे इनक्युबेशन सेंटर्स सदर प्रकल्पांचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी मदत करणार आहेत. जर तुम्ही स्टार्टअप सुरु करण्याच्या विचारात असाल आणि तुमच्याकडे अशी काही इनोव्हेटिव्ह आयडीया असेल तर तुम्ही या स्पर्धेत नक्कीच भाग घेतला पाहिजे. यातून तुम्हांला एक नवी ओळख मिळेलच परंतु त्यासोबतच यानिमित्ताने गुंतवणूकदार देखील मिळू शकतील.
हे आहेत इनक्युबेशन सेंटर्स
बोईंग इंडियाने त्यांच्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी देशभरातील नामांकित अशा इनक्युबेशन सेंटर्सशी करार केला आहे. यात फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर-IIT दिल्ली, IIT मुंबई, T-Hub हैदराबाद, IIT गांधीनगर, IISc बेंगळुर, IIT मद्रास इनक्यूबेशन सेल, आणि KIIT भुवनेश्वर यांचा समावेश आहे.