Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

Read More

Tomato prices crash : टोमॅटो पुन्हा रस्त्यावर; आवक वाढल्याने टोमॅटोला मिळतोय कवडीमोल दर

टोमॅटोचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले असून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला प्रति क्विंटल 100 ते 300 रुपये दर मिळत आहे. टोमॅटोसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवडाभरात टोमॅटोला 1 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे. तर राज्यातील इतर बाजार पेठेत टोमॅटोचे दर 3 ते 5 रुपये किलो आहे.

Read More

Tomato Price Hike: हॉटेल मेन्यूमधून टोमॅटो होतायेत बाद, टोमॅटोची गुणवत्ता ठरतोय कळीचा मुद्दा!

सध्या बाजारात जो माल विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता हा देखील एक मुद्दा आहे. टोमॅटोचे पिक हे नाशवंत श्रेणीतील असल्यामुळे खराब हवामान, पावसाचा परिणाम पिकावर बघायला मिळतो आहे. चांगल्या गुणवत्तेचे टोमॅटोत बाजारात उपलब्ध नसल्याने मोठमोठ्या हॉटेल्सने त्यांच्या मेन्यूमधून टोमॅटो हद्दपार केला आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, आयातीची प्रक्रिया सुरु

केंद्र सरकार टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते आहे. यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या आठवड्याच्या शेवटी नेपाळमधून टोमॅटोची पहिली खेप भारतात पोहोचेल असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read More

Food plate cost : टोमॅटोच्या दरवाढीने शाकाहारी थाळींचे दरही लालेलाल; जेवणाचा खर्च 34 टक्क्यांनी महाग

महाग झालेले मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला आणि किलोसाठी 150 रुपयांच्या टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोने सर्व सामान्याचे जेवण महाग केले आहे. मार्केटचा अभ्यास करणाऱ्या क्रिसील (Crisil) या कंपनीने एक थाळी जेवण तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जुलै महिन्यात शाकाहारी जेवणाची थाळीसाठी येणाऱ्या खर्चामध्ये तब्बल 34 % टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Tomato Price Hike: 300 रु. किलो भावाने मिळू शकतात टोमॅटो! दिल्लीकर महागाईने बेजार…

टोमॅटोची आवक घटण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तरेतील राज्यांमध्ये होणारी अतिवृष्टी. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि इतर राज्यांना टोमॅटोचा पुरवठा होत असतो. मात्र गेल्या महिना-दोन महिन्यांपासून त्या राज्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे दळणवळणाची व्यवस्था कोलमडली आहे. तसेच शेती पिकांचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोचा भाव कमी होणार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आवक वाढली…

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोच्या नवीन पिकाच्या अधिक पुरवठ्यामुळे किरकोळ किरकोळ किमतीत घसरण होण्याची अपेक्षा आहे. मान्सूनच्या पावसामुळे आणि इतर समस्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव वाढले होते असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

Read More

Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत भर, RBI ने व्यक्त केली चिंता

RBI चे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने सादर केलेल्या बुलेटीननुसार टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे देशातील एकूण चलनवाढीमध्ये कमालीचा परिणाम जाणवू लागला आहे. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतींचा परिणाम किरकोळ आणि घाऊक बाजारातील इतर भाज्यांच्या किमतीवर देखील पाहायला मिळतो आहे.

Read More

Tomato Price: जुन्नरमधल्या शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 2.8 कोटी रुपये!

ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर हे मिळून शेती करतात. बारा एकर शेतीत त्यांनी यावर्षी टोमॅटोचे पीक घेतले होते. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सातत्याने टोमॅटोचे पीक घेत आहेत. यावर्षी त्यांच्या शेतात टोमॅटोचे दमदार उत्पन्न निघाले असून त्यांनी आतापर्यंत 17,000 क्रेट विकले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचे भाव वधारले असताना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे.

Read More

Tomato Price Hike: बापरे! 15 रुपयाला एक टोमॅटो, 150 रुपये किलोने टोमॅटोची होतेय विक्री!

किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले असताना ग्राहक पावशेर किंवा आर्धा किलोच टोमॅटो खरेदी करत आहेत. सध्या मुंबई आणि ठाण्यात नगाप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. अनेक ठिकाणी एक टोमॅटो 15 रुपयांत विकला जातो आहे.

Read More

Tomato Price: टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर लावले सीसीटीव्ही..!

Tomato Price in India: सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक असलेल्या टोमॅटोनं सध्या किंमतीचा उच्चांकच केला आहे. बाजारात सध्या टोमॅटोचा दर 130 ते 160 रुपये किलो असा सुरू आहे. त्यात टोमॅटो चोरीचे प्रकार आता वाढायला लागले आहेत. हे रोखण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

Read More

Tomato Price Hike : महागाईचा झटका; मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरमधून टोमॅटो हद्दपार

टोमॅटोचे दर भारतात 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे क्वॉलिटीचा टोमॅटोदेखील बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे हॉटेल आणि फास्ट फूड व्यावसायिकांना आवश्यक असा टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फटका मॅकडोनाल्ड्सलाही (McDonalds) बसला आहे.

Read More