Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Read More

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्सकडून 9.9 टक्के समभागांची विक्री; 1,613 कोटींची डील पक्की

Tata Tech IPO येण्यापूर्वीच टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक कंपनीतील आपला 9.9 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे समभाग क्लायमेट फोकस प्रायव्हेट इक्विटी फंड आणि रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशन खरेदी करणार आहे. यासाठी 1,613.7 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचे सांगितले जाते.

Read More

Tata's Kashmiri Saffron : टाटाची कंपनी आता विकणार काश्मिरी केशर; ग्राहकांना मिळणार 100% शुद्ध केशर

यापुढे ग्राहकांना मोठ्या विश्वासाने शुद्ध काश्मिरी केशर खरेदी करता येणार आहे. टाटा समूहाच्या हिमालयन या कंपनीकडून शुद्ध केशरची विक्री केली जाणार आहे. हिमालयन कंपनी आता ग्रेड 1 चे काश्मिरी केशर(kashmiri saffron) ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे.

Read More

Tata Group Dividend: टीसीएसनं केली लाभांशाची घोषणा, पहिल्या तिमाहीत कमावला 11074 कोटी नफा

Tata Group Dividend: टाटा समूहाची आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं 2024 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. 12 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांशाला मंजुरी देण्यात आली.

Read More

iPhone Manufacuring: ‘टाटा’ बनणार आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी, कर्नाटकातील प्रकल्प घेणार ताब्यात

विस्ट्रॉन आणि टाटा समुहात झालेल्या या कराराचे किंमत 600 दशलक्ष डॉलर्स असल्याचे बोलले जात आहे. विस्ट्रॉन कंपनीत सद्यस्थितीत जवळपास 10,000 कर्मचारी काम करत आहेत. टाटा कंपनीने अधिग्रहण केल्यानंतर हे कर्मचारी कायम राहणार आहेत. कामात कुठलाही बदल होणार नाहीये.यानंतर कुठल्याही भारतीय उद्योगाची 100% गुंतवणूक असलेली कंपनी आयफोन हा मोबाईल बनवणार आहे.

Read More

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनण्याच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेकडून टाटा समूहाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलसोबतचा लवकरच करार होऊ शकतो.

Read More

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला 36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते.

Read More

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर टाटा स्टीलची मोठी कारवाई, 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर आता टाटा स्टीलनंही आक्रमक पवित्रा घेतला असून जवळपास 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Read More

Tata small cap fund: टाटा स्मॉल कॅप फंडात 1 जुलैपासून गुंतवणूक बंद, कंपनीनं काय सांगितलं?

Tata small cap fund: टाटा म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या स्मॉल कॅप फंडात आता पैसे गुंतवता येणार नाहीत. कंपनीनं 1 जुलै 2023पासून टाटा स्मॉल कॅप (TSC) फंडातल्या एकरकमी रक्कम स्वीकारणं आणि गुंतवणूक करणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Tata Technologies IPO: टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला सेबीची मान्यता, 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी

Tata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला भांडवली बाजार नियामक सेबीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

Read More

Tata group : टाटा ग्रुपचा नवा विक्रम, वर्षभराच्या कालावधीत कमावले 10 लाख कोटी!

Tata group : टाटा ग्रुपनं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ग्रुपनं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. यानिमित्तानं वर्षभराच्या कालावधीत अशाप्रकारे विक्रमी महसूल मिळवणारा टाटा ग्रुप हा पहिलाच गट ठरलाय. तसंच यात मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.

Read More

Tata Group : टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलची मोठी ऑफर! 4G सेवेत असणार महत्त्वाची भूमिका

Tata Group : बीएसएनएलच्या 4G सेवेत लवकरच सुधारणा होणार आहे. टाटा ग्रुपच्या कंपनीला बीएसएनएलनं ऑर्डर दिलीय. देशभरात 4G नेटवर्कचा विस्तार करण्यासाठीची ही ऑफर आहे. बीएसएनएल ही सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे.

Read More