Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: या दिवशी ओपन होणार टाटा कंपनीचा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली

Tata Technologies IPO open next month

Image Source : www.tatatechnologies.com

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

Tata Technologies IPO: भारतातील सर्वांत मोठा उद्योग असलेल्या टाटा समुहातील कंपनीचा आयपीओ तब्बल 19 वर्षांनी येत आहे. गुंतवणूकदार या आयपीओची कित्येक महिन्यांपासून वाट पाहत होते. ती प्रतिक्षा आता संपली असून पुढील महिन्यात टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies IPO) आयपीओ येण्याची शक्यता आहे.

टाटा ग्रुपमधील टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ 2004 मध्ये आला होता. आता त्यानंतर तब्बल 19 वर्षांनी टाटा कंपनीचा आयपीओ येत आहे. टाटा ग्रुप आणि या ग्रुपमधील कंपन्यांबद्दल गुंतवणूकदारांचे प्रचंड आकर्षण आणि तितकाच विश्वास आहे.

टाटा मोटर्सची पार्टनरशीप असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीने यासंदर्भात सेबीकडे कागदपत्रे दाखल केली असून, त्याला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. आयपीओ येण्यापूर्वीच टाटा मोटर्स कंपनीने 9.9 टक्के हिस्सा विकला होता. त्यातील 9 टक्के शेअर्स हे क्लायमेट फोकस प्रायव्हेट इक्विटी फंड कंपनीने तर 0.9 टक्के शेअर्स रतन टाटा एण्डोमेंट फाऊंडेशनने खरेदी केला.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची मार्केटमधील व्हॅल्यू जवळपास 16,300 कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून सर्व शेअर्स हे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये एकही नवीन शेअर वितरित केला जाणार नाही. टाटा मोटर्सने यामधील आपली हिस्सेदारी कमी केली असली तरी, बराचसा भाग म्हणजे एकऊम 74.69 टक्के अजून त्यांच्याकडेच आहे. या व्यतिरिक्त इतर दोन भागधारकांकडून शेअर्सची विक्री केली जाणार आहे.

कंपनी आयपीओच्या माध्यमातून ऑफर फॉर सेल अंतर्गत 9.57 कोटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यातील टाटा मोटर्स 8.11 कोटी शेअर्स, अल्फा टीसी होल्डिंग्स 97.16 लाख शेअर्स टाटा कॅपिटल कंपनी 48.58 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी डिजिटल, इंजिनिअरिंग आणि टेक्निकल सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत असणारी जगभरातील नामांकित कंपनी आहे. यांचे जगभरात 18 डिलेव्हरी सेंटर्स असून यामध्ये जवळपास 11 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सची किंमत 255 रुपयांवर ट्रेण्ड करत आहे. 

(डिसक्लेमर : आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' आयपीओ, शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)