Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर टाटा स्टीलची मोठी कारवाई, 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर टाटा स्टीलची मोठी कारवाई, 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Image Source : www.marathi.hindustantimes.com

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर आता टाटा स्टीलनंही आक्रमक पवित्रा घेतला असून जवळपास 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

टाटा स्टीलचे (Tata Steel) चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती कंपनीच्या एजीएममध्ये दिली आहे. पदाचा गैरवापर करणं, वैयक्तिक फायद्यासाठी निर्णय घेणं, काँट्रॅक्ट मॅनेजमेंट अ‍ॅग्रीमेंटचं उल्लंघन केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई (Action) करण्यात आली आहे. कंपनीला या कर्मचाऱ्यांच्या विरोधात व्हिसलब्लोअर्सकडून तक्रारी (Complaints) मिळाल्या होत्या. या 38 कर्मचाऱ्यांपैकी 35 कर्मचाऱ्यांना अनैतिक कार्य आणि तीन कर्मचाऱ्यांना लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. एबीपीनं हे वृत्त दिलं आहे.

अनेक तक्रारी 

एन. चंद्रशेखरन म्हणाले, की टाटा स्टीलकडे गेल्या आर्थिक वर्ष 2022-23मध्ये 875 तक्रारी आल्या होत्या. यात 158 व्हिसलब्लोअर्सकडून मिळाल्या होत्या, 48 सुरक्षेशी संबंधित होत्या, 669 एचआरशी संबंधित होत्या आणि काही तक्रारी वागणुकीशी संबंधित होत्या. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर तक्रारी मिळणं ही काही चुकीची गोष्ट नाही, कारण ते कंपनीच्या ओपन कल्चरलाच दर्शवते. ते म्हणाले, की कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी याठिकाणी प्रोत्साहन दिलं जातं.

नुकतीच केली होती कारवाई

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं काही दिवसांपूर्वी लाच घेऊन भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली होती. टीसीएसनं 6 कर्मचाऱ्यांना यासंदर्भानं काढून टाकलं. तसंच नोकरभरतीत सहभागी असलेल्या सहा व्यावसायिक सहयोगी संस्थांवरदेखील बंदी घालण्यात आली. टीसीएसच्या कर्मचार्‍यांवर करण्यात आलेली कारवाईदेखील एन. चंद्रशेखरन यांनी एजीएममध्ये सांगितली होती.

अशा घटना घडणार नाहीत, यासाठी उचलली पावलं

भागधारकांशी बोलताना एन. चंद्रशेखरन म्हणाले, की सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं वर्तन नैतिकतेच्या विरुद्ध होतं. त्या सर्व सहा कर्मचारी आणि अशा सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी आणखी तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. टीसीएस बिझनेस असोसिएट सप्लाय मॅनेजमेंट प्रोसेसमधल्या कमतरता आणि दोषांविषयी समीक्षा करणार आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे.