प्रायमरी मार्केटमध्ये लवकरच टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ (Initial Public Offering) येणार आहे. टीसीएसच्या (Tata Consultancy Services) आयपीओनंतर हा टाटा ग्रुपचा पहिलाच आयपीओ असणार आहे. टीसीएसचा आयपीओ हा 2004मध्ये आला होता. त्यानंतर आता 19 वर्षांनंतर टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ येत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज (TATA Technologies) ही टाटा ग्रुपमधली कंपनी (Tata Group) टाटा मोटर्सची (Tata Motors) उपकंपनी आहे. टाटा टेक्नॉलॉजीजनं 9 मार्च 2023 रोजी सेबीकडे (Securities and Exchange Board of India) डीआरएचपी (Draft Red Herring Prospectus) दाखल केला होता. आता याला मंजुरी मिळाली आहे.
Table of contents [Show]
टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओविषयी...
टाटा टेक्नॉलॉजीजच्या पब्लिक इश्यूमध्ये 9.57 कोटी शेअर्स म्हणजेच 23.6 टक्के शेअर्स ओएफएसद्वारे (OFS) विकले जाणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्स लिमिटेडचे 8,11,33,706 इक्विटी शेअर्स असणार आहेत. याव्यतिरिक्त अल्फा टीसी होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आपले 97,16,853 इक्विटी शेअर्स विकणार आहे. तर टाटा कॅपिटल ग्रोथ फंड (I) ओएफएसमध्ये 48,58,425 शेअर्स विकणार आहे.
निधीविषयी माहिती नाही
टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओचे लीड बुक मॅनेजर जेएम फायनान्स लिमिटेड (JM Financial Ltd), बीओएफए सिक्युरिटीज (BofA Securities) आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया (Citigroup Global Markets India) असतील. कंपनीनं सेबीकडे केवळ आयपीओसंबंधी कागदपत्र दाखल केली होती. मात्र या आयपीओच्या माध्यमातून किती निधी उभारला जाणार आहे, आयपीओची प्राइस बँड काय असेल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टाटा टेक्नॉलॉजीजचा व्यवसाय
टाटा टेक्नॉलॉजीजची स्थापना 33 वर्षांपूर्वी झाली. टाटा टेक्नॉलॉजीज उत्पादन अभियांत्रिकी (Product engineering) आणि डिजिटल सेवांच्या (Digital services) व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी आणि एरोस्पेस क्षेत्रांनादेखील सेवा देते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे कंपनी व्यवसायासाठी मुख्यतः टाटा समूहावर अवलंबून असते. त्यातही टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर कंपनी यांचा समावेश आहे. या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्या सायन्ट (Cyient), इन्फोसिस (Infosys), केपीआयटी टेक्नॉलॉजीज (KPIT Technologies), परसिस्टंट (Persistent) आहेत.
#TataTechnologies receives #SEBI approval for #IPO.
— BQ Prime (@bqprime) June 27, 2023
For the latest news and updates, visit: https://t.co/gXeGqKQ77P pic.twitter.com/KiA1GNmkE9
डीआरएचपी म्हणजे काय?
जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्स विकून लोकांकडून पैसे उभारण्याची योजना म्हणजेच आयपीओ उपलब्ध करून देते तेव्हा ती ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) फाइल करत असते. यालाच ऑफर डॉक्युमेंट किंवा प्राथमिक नोंदणी दस्तावेज असं म्हणतात. हे दस्तावेज भांडवली बाजार नियामक सेबीला सादर केली जातात.
गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल दिली जाते माहिती
डीआरएचपी हे मुळात एक विस्तारित किंवा व्यापक असं दस्तावेज आहे. या माध्यमातून संभाव्य गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल महत्त्वाची माहिती दिली जाते किंवा ती देण्यासाठी दाखल केलं जातं. त्यामुळे समजा कोणाला कंपनीचे शेअर्स आयपीओच्या माध्यमातून खरेदी करायचे असतील तर तुम्हाला कंपनीबद्दल सर्व काही जाणून घ्यावं लागेल आणि त्यासाठी महत्त्वाचं असेल डीआरएचपी...