Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023 : पंढरपूरचे अर्थकारण; आषाढीवारी काळात होते कोट्यवधीची उलाढाल

आषाढी वारी (Ashadhi wari)काळात पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेचे(Economy of Pandharpur )लहान-मोठे व्यवसाय हे प्रमुख स्त्रोत आहेत. वारी काळात अंदाजे 15 लाख वारकरी पंढरपुरात दाखल होतात. त्यामुळे या काळात इथल्या अर्थकारणाला मोठी चालना मिळते. इथे येणारा प्रत्येक वारकरी सरासरी 300 ते 400 रुपये खर्च करतो. त्यामुळे फक्त आषाढी वारी काळात पंढरपुरात कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते.

Read More

Pandharpur Wari 2023: लाडूविक्रीसह विविध योजना अन् उपक्रमांतून पंढरपूर देवस्थान देतं भाविकांना सुविधा

Pandharpur Wari 2023: पंढरपुरात पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान लाडूंच्या विक्रीसह विविध योजनादेखील राबवत असते. याचा देवस्थानासह सर्वांनाच लाभ मिळतो. काही योजनांमध्ये नाममात्र गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

Read More

Dhapewada Yatra: विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे भरते भव्य यात्रा, शेती साहित्याची होते सर्वाधिक विक्री

Pandharpur Wari 2023: विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा असते. त्या यात्रेबाबत विशेष माहिती जाणून घेऊया.

Read More

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठल-रखुमाईच्या दगडी मूर्तींनी सजली पंढरपूर नगरी; दरवर्षो होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Ashadhi Ekadashi 2023: देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेत आहे. या शिल्पकलेच्या माध्यमातून पंढरपुरातील वडार समाज आजही दगड्याच्या माध्यमातून विठ्ठलाला घरोघरी पोहचवत आहेत. दगडी मूर्तीच्या विक्रीतून दर आषाढी एकादशीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

Read More

Pandharpur Yatra 2023: पंढरपुरातल्या प्रत्येक घरात उतरतात वारकरी, होते लाखोंची उलाढाल…

पूर्वीच्या काळी जेव्हा हॉटेल्स, भक्त निवास नव्हते तेव्हा वारकरी मंडळी ही पंढरपुरातील स्थानिक रहिवाश्यांच्या घरी उतरायचे. दरवर्षीच्या नियमित वारीमुळे सगळेच वारकरी एकमेकांना ओळखत असत. ज्या घरात वारकरी उतरत त्या घरातील यजमानांना काही रक्कम दिली जाते. वारकऱ्यांच्या पाहुणचार करणे याला ‘यजमान कृत्य’ असे म्हणतात. जाणून घ्या‘यजमान कृत्य’ म्हणजे नेमके काय?

Read More

Pandharpur Yatra 2023: दिंडीत सामील व्हायचं असेल तर पैसे द्यावे लागतात का? दिंडीची खरेदी-विक्री होते का?

प्रत्येक दिंडीचे स्वतंत्र नियोजन असते. दिंडीचा कालावधी हा 20 दिवस ते 2 महिने असाही असतो. पंढरपूर ते गावाचे अंतर यानुसार दिंडीचा कालावधी देखील कमी जास्त होत असतो. दिंडीच्या प्रवासात शिधा, किराणा, औषध, सोबत असलेल्या गाड्यांसाठी पेट्रोल-डीझेल अशी व्यवस्था करावी लागते. चला तर जाणून घेऊया दिंडीचे आर्थिक नियोजन कसे केले जाते...

Read More

Pandharpur Wari 2023: विठुरायाच्या भक्तांसाठी एसटीही सेवेत! राज्यभर धावणार विशेष गाड्या, पथकरातून सूट

Pandharpur Wari 2023: लाडक्या पांडुरंगाच्या भक्तांसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीदेखील आता सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी जवळ येत आहे, तसा वारकऱ्यांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. एसटी महामंडळानंदेखील या सोहळ्यासाठी आपली सेवा देण्याचं ठरवलं आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: फेरीवाले, विक्रेत्यांची आषाढी वारी; 20 दिवस वारीसोबत दुकान घेऊन प्रवास

आषाढी वारी पुण्यातील मुक्काम झाल्यानंतर पुढे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या सहभागी झाल्या आहेत. ही पायी वारी पुढील 20 दिवसांनी पंढरपुरात पोहचेल. लाखो वारकरी आणि भाविक यांनी वारीमार्ग फुलून जातो. मुक्काम स्थळाला यात्रेचं स्वरूप येतं. वारकऱ्यांसोबत फेरीवाले विक्रेत्यांचीही वारी घडते.

Read More

Pandharpur Wari 2023: रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर ते पंढरपूर 40 दिवसांची वारी, किमान खर्चात वारकऱ्यांना पंढरपूरचे दर्शन

Pandharpur Wari 2023: संत सदाराम महाराजांनी तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी 1594 साली सुरु केली. आई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली पालखी महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे. ही पालखी तब्बल 40 दिवस पायी चालते. तर जाणून घेऊया या 40 दिवस पायी चालणाऱ्या वारीचे आर्थिक गणित.

Read More

Pandharpur Wari 2023: विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या व्यवसायातून किती कुटुंबांना रोजगार मिळतो?

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक हे पंढरपुरला जातात. पंढरपुरात गेल्यानंतर तुळशीची माळ अर्पण करुन विठुरायाचे दर्शन घेतात. पंढरपूर वारीत तुळशीच्या माळांना आणि हारांना प्रचंड महत्त्व आहे. यामागे अनेक धार्मिक मान्यता आहेत. आज आपण विठ्ठलाला वाहिली जाणारी तुळस आणि मंजुळाच्या माळांवर किती कुटुंबाचा रोजगार चालतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read More

Pandharpur Wari 2023: लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण; राज्य सरकारकडून मोठी घोषणा

Pandharpur Wari 2023: पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सरकारतर्फे विमा (इन्शुरन्स) संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना घोषित केली. हे विमा संरक्षण 30 दिवसांसाठी लागू असणार आहे. ही योजना मदत व पुननर्वसन विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

Read More

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी विदर्भातून धावणार विशेष ट्रेन

Vidarbha to Pandharpur Trains : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया, त्या विशेष ट्रेन कोणत्या?

Read More